Manoj Jarange Vs Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manoj Jarange Vs Chhagan Bhujbal : येवल्यात राडा! मनोज जरांगे-छगन भुजबळ समर्थक भिडले

Roshan More

Manoj Jarange Vs Chhagan Bhujbal : मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांचे समर्थक येवल्यातील 'शिवसृष्टी'बाहेर भिडले. छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी मनोज जरांगे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी शिवसृष्टीबाहेर ठिय्या आंदोलन केले. जरांगेंच्या समर्थकांकडून छगन भुजबळ समर्थक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

शिवसृष्टीमध्ये मनोज जरांगे पाटील आले होते. ते तेथून गेल्यानंतर शिवसृष्टी परिसरात छगन भुजबळ यांचे समर्थक जमले. त्यांनी जरांगेंना विरोध करण्यासाठी घोषणाबाजी केली. त्यानंतर मनोज जरांगेंच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे दोन्ही गट एकमेकांना भिडले. शिवसृष्टीच्या परिसरात तणावाचे वातवारण निर्माण झाले होते. जरांगेंच्या समर्थकांनी जबरदस्तीने शिवसृष्टीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी दोन्ही गटांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही गट माघार घेण्यास तयार नव्हते. जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी शिवसृष्टी परिसरात ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर ते मुख्य रस्त्याकडे वळले. तेथे त्यांनी रास्ता रोको केला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर काही वेळात रास्ता रोको मागे घेण्यात आला.

जरांगे गेलेल्या येवल्यातील शिवसृष्टीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले होते. आज जरांगे हे शिवसृष्टीमध्ये गेले होते. त्याची माहिती मिळाल्यानंतर छगन भुजबळ समर्थक शिवसृष्टी परिसरात जमायला लागले. या शिवसृष्टीपासून जवळच छगन भुजबळ यांचे जनसंपर्क कार्यालय असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, जरांगे हे शिवसृष्टीतून गेल्यानंतर छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करण्यास करण्यास सुरुवात केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT