Chhagan-Bhujbal-Manoj-Jarange-Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manoj Jarange Patil Agitation: छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातून मुंबईत जरांगेच्या आंदोलकांसाठी "एक भाकरी समाजासाठी" उपक्रम!

Manoj Jarange patil; Maratha activists from Chhagan Bhujbal's constituency are active, will provide vegetable bread to protesters in Mumbai-येवला- लासलगाव मतदारसंघातील मराठा आरक्षण आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी जाहीर केली भूमिका.

Sampat Devgire

Manoj Jarange patil News: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आंदोलन होत आहे. हे आंदोलन सध्या राज्यभर चर्चेचा विषय आहे. यानिमित्ताने महायुती सरकारकडून जरांगे पाटील यांच्यावर जोरदार राजकीय हल्ला होत आहे.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये या भूमिकेवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ ठाम आहेत. जरांगे पाटील यांच्या मुंबईत आंदोलनाला देखील भुजबळ यांचा विरोध आहे. मात्र त्यांच्याच मतदारसंघातील मराठा कार्यकर्ते मुंबईत मोर्चेकर्‍यांना मदतीसाठी सरसावले आहेत.

येवला- लासलगाव मतदारसंघातील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला पाठिंबा जाहीर करण्यात आला. आमच्यासाठी मतदारसंघातून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते सक्रिय सहभाग घेणार आहेत. मुंबईतील मोर्चेकर्‍यांना येवल्यातून भाजी- भाकरी पुरविण्याचा निर्णय या कार्यकर्त्यांनी घेतला.

येवला- लासलगाव मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी घेतलेला हा निर्णय चर्चेचा विषय आहे. विधानसभा निवडणुकीत देखील या मतदारसंघात छगन भुजबळ यांना विरोधासाठी मराठा क्रांती मोर्चा कडून जोरदार मोर्चे बांधणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा हा मतदारसंघ चर्चेचा विषय ठरला आहे.

येवला आणि लासलगाव मतदार संघातील सकल मराठा समाजाची बैठक नुकतीच झाली. समाजाच्या आरक्षणासाठी लढणाऱ्या आंदोलकांना कोणत्याही स्थितीत उपाशी राहू देणार नाही. त्याची काळजी घेण्यासाठी मतदारसंघात "एक भाकरी समाजासाठी" हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. भाकरी चटणी आणि भाजी संकलित करून ती मुंबईला पाठविली जाईल. शाहू शिंदे, सचिन आहेर, प्रवीण कदम, शिवा सुरासे, गोपीनाथ ठुबे यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

अंतरवेली सराटी येथून बुधवारी सकाळी कार्यकर्त्यांसह मनोज जरांगे पाटील मुंबईला आंदोलनासाठी रवाना होणार आहेत. त्याच्या दुसऱ्या दिवशी नाशिक येथून मोठ्या संख्येने कार्यकर्ते देखील मुंबईला जातील. यावेळी मुंबईच्या आंदोलनाला नाशिकच्या सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी मोठी ताकद देण्याचा निर्णय घेतला आहे.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT