Manoj Jarange Patil, Chhgan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

OBC Reservation : मराठा योद्धे जरांगे-पाटलांचं मोठं वक्तव्य; ...तर मंडल आयोगाला...

Maratha Reservation : ओबीसी आरक्षण कुणामुळे दावणीला, यावर मनोज जरांगे-पाटलांनी थेट कुणाकडे दाखवले बोट?

Arvind Jadhav

Nashik Manoj Jarange Patil News :

मंडल आयोगाला कोर्टात चॅलेंज करण्याची आमची इच्छा नाही. पण, ते सतत विरोध करत आहेत. विनंती केली, समजावून सांगितले. मध्यस्थ टाकले, तरीही त्यांचा विरोध सुरूच आहे. तीन वेळा त्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न हाणून पाडला. आम्ही किती वेळा सहन करायचं. सहन करण्याची सीमा संपल्यानं आम्ही थेट मंडल आयोगालाच चॅलेंज करण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचलो आहोत, हे मोठं वक्तव्य केलंय मराठा आरक्षणाचे (Maratha Reservation) योद्धे मनोज जरांगे-पाटील यांनी.

मंडल आयोग चॅलेंज (Mandal Aayog) होऊ शकतं, याची जाणीव त्यांना आहे. खरेतर याबाबत ओबीसी समाजानं मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनाच समजून सांगावं, असा हल्लाबोल मनोज जरांगे-पाटील यांनी केला आहे.

नाशिक दौऱ्यावर असलेल्या मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सकाळी पत्रकार परिषदेत मंडल आयोग आणि आगामी उषोषणाची भूमिका स्पष्ट केली. या वेळी त्यांनी नेहमीप्रमाणेच मंत्री भुजबळांवर टीकास्त्र सोडलं. हा भुजबळांचा नाही तर जनतेचा बालेकिल्ला आहे. मंत्रिपदाचा राजीनामा द्या नाही तर देऊ नका, त्यानं आम्हाला फरक पडणार नाही, असं जरांगे-पाटील भुजबळांच्या राजीनाम्यावर म्हणाले.

'...तर जबाबदारी भुजबळांची'

ओबीसी म्हणून आमच्या नोंदी सापडल्यात. त्यानुसार आम्ही ओबीसी आरक्षण मागतो. पण, भुजबळ सातत्यानं विरोध करत आहेत. मागास सिद्ध झालो तरी हे कोर्टात गेले. राणे समितीच्या वेळेस आणि ओबीसी सवलतींच्या मागणीवेळेसही तेच झाले. सर्वच मुद्दे हे एका कोर्टात फेटाळून लावतात. आमची सहन करण्याची क्षमता संपली, असं जरांगे-पाटील म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तुम्ही आमच्या मागण्यांना कोर्टात चॅलेंज करतात. आम्हालाही ते करता येत होतं. आम्ही ते केलं नाही. पण यांचा विरोध कायम राहिला. त्यामुळे आता थेट मंडल आयोगाला चॅलेंज करणं हाच आमच्याकडे एकमेव पर्याय आहे. मंडल आयोग चॅलेंज होऊ शकतो आणि देशातील 27 टक्के आरक्षण जाऊ शकते, हा धोका आहे. मात्र, याची जबाबदारी भुजबळ यांचीच असल्याचा दावा जरांगे-पाटील यांनी केला.

...म्हणून 10 फेब्रुवारीपासून उपोषण

'सगेसोयरे' शब्दाचा समावेश असलेली अधिसूचना सरकारनं काढली. पुढे अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर होणं आवश्यक आहे. 15 तारखेला अधिवेशन सुरू होईल. मात्र, अद्याप आम्हाला तशी तयारी दिसत नाही. त्यामुळे मी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला, असं जरांगे-पाटलांनी स्पष्ट केलं.

(Edited by Avinash Chandane),

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT