Manoj Jarange News  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manoj Jarange News : मनोज जरांगे पाटील आठ ऑक्टोबरला नाशिकला ; मराठा आंदोलनकर्त्यांची भेट घेणार

Maratha Reservation : सकल मराठा समाजाचे नाशिकमध्ये सुरू असलेल्या साखळी उपोषणाला येत्या ८ ऑक्टोबरला मनोज जरांगे पाटील भेट देणार आहेत.

Amol Jaybhaye

Nashik News : सकल मराठा समाजाचे नाशिकमध्ये सुरू असलेल्या साखळी उपोषणाला येत्या ८ ऑक्टोबरला मनोज जरांगे पाटील भेट देणार आहेत. नाशिकमधील साखळी उपोषणाचा १४ वा दिवस आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले द्यावेत या मागणीसाठी राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द व त्यासाठी आंदोलक जरांगे पाटील यांनी राज्यसरकारला ४० दिवसांची मुदत दिली आहे.

या मुदतीत राज्यभर मराठा आंदोलक विविध ठिकाणी साखळी उपोषणात बसले आहेत. त्यांच्या भेटीसाठी मनोज जरांगे पाटील हे येणार आहेत. ३० सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर दरम्यान राज्यभर आंदोलकांच्या भेटीगाठी जरांगे पाटील राज्याचा दौरा करणार आहेत.

त्यांची नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी सुरू असलेल्या मराठा साखळी उपोषणात त्यांनी भेट द्यावी याबाबतीत संयोजकांनी जरांगे पाटील यांचेशी संपर्क केला होता. त्यानुसार हा दौरा राज्यभर होणार असल्याची माहिती दौरा संयोजक समितीतील सदस्य प्रदीप सोळुंखे यांनी दिली आहे.

जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे या मागणीसाठी उपोषणाला बसले होते. उपोषणस्थळी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्चमुळे अनेक आंदोलक जखमी झाले होते. यानंतर राज्यभरात मराठा समाजाने आक्रमक प्रवित्रा घेत आंदोलन पुकारले होते. त्यानंतर राज्य सरकारने (State Government) आंदोलनाची गंभीर दखल घेत, मराठा आरक्षणावर एक महिन्यात निर्णय घेणार असे जाहीर केले होते.

तसेच आंतरवाली सराटी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भेद देऊन जरांगे यांचे उपोषण सोडवले होते. यानंतर आता राज्यात विविध ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. तेथे जरांगे भेटी देणार आहेत.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT