Nashik News : कंत्राटी भरतीप्रकरणी राज्य सरकारची झोप उडवू!

CITU warns state Government on Contract employment bill-शासनाने कंत्राटी बिल मागे घ्यावे; अन्यथा राज्य सरकार विरोधात तीव्र आंदोलन होईल.
CITU delegation
CITU delegationSarkarnama

Contract labour in Government : सरकारने कंत्राटी कामगारांची भरती पुरवठादारांमार्फत करण्याचा निर्णय रद्द करावा. तसे न केल्यास राज्यातील सर्व कामगार- कर्मचारी संघटना एकजुटीने याविरुद्ध तीव्र आंदोलन करतील, असा इशारा `सिटू`च्या संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

याबाबत आज सिटू (CITU) कामगार (Labour) संघटनेच्या वतीने कामगार उपायुक्त कार्यालयात (Nashik) निवेदन देण्यात आले. या प्रश्नावर राज्य सरकारशी (Maharashtra Government) संघर्ष करू असा इशारा देण्यात आला.

CITU delegation
MNS Nandurbar News : ‘मनसे’ने खाते उघडले, रेखाबाई माळी झाल्या बिनविराेध सरपंच!

शासन निर्णयाद्वारे सरकारच्या अति कुशल, कुशल, अर्ध कुशल, अकुशल अशा सर्व प्रकारचे मनुष्यबळ पॅनेलमधील नऊ एजन्सीमार्फत पुरविले जाणार आहे. यामध्ये कामगारांचे शोषण होणार आहे. त्यांना जे वेतन जाहीर केले आहे, त्यातील कपातीचा विचार करता त्यांच्या हाती फक्त ६० टक्के रक्कम मिळेल. १५ टक्के कमिशन शासनाने निश्चित केलेल्या एजन्सीला मिळणार आहे.

आश्चर्यकारक हे आहे की, प्रस्तावित केलेले वेतन, किमान वेतन कायद्यानुसार सध्या देय असलेल्या किमान वेतनापेक्षाही कमी आहे.

आज महाराष्ट्रामध्ये दोन लाखांपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. सध्याच्या घटनात्मक तरतुदीनुसार या विभागामध्ये आरक्षण लागू आहे. परंतु या शासन निर्णयामध्ये आरक्षणाबद्दल कुठलीही तरतूद केलेली नाही. मग महाराष्ट्र शासनाने आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे काय, असे असल्यास हा घटनात्मक तरतुदीचा भंग होतो. यातून या शासनाचा आरक्षण विरोधी मनुवादी वृत्ती स्पष्ट दिसत आहे.

आज राज्यामध्ये हजारो कॉलेजमधून लाखोंच्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. खासगीकरणाच्या काळामध्ये शिक्षणावर पालकांना प्रचंड खर्च करावा लागतो. विद्यार्थी युवकांना जीवघेण्या स्पर्धेला तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत डिग्री घेऊन व स्पर्धा परीक्षेची तयारी करून या विद्यार्थी व युवकांना कंत्राटी पद्धतीने नेमणूक देणे अत्यंत अन्यायकारक व अमानवी आहे.

CITU delegation
BJP MP News : भाजप खासदारांचा पत्ता कट होणार? सुमार कामगिरी असलेल्यांना नारळ...

सरकारने हा निर्णय रद्द न केल्यास राज्यातील सर्व कामगार कर्मचारी संघटना एकजुटीने याविरुद्ध तीव्र आंदोलन करतील ,असा इशाराही सिटूच्या वतीने मा. कामगार उपायुक्त कार्यालय, सातपूर, नाशिक येथे निवेदन देताना सांगितले.

सिटू संघटनेच्या वतीने कामगार उपयुक्त व्ही. एन. माळी यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सीताराम ठोंबरे, तुकाराम सोनजे, सतीश खैरनार, संतोष काकडे, संतोष कुलकर्णी, हिरामण तेलोरे, भिवाजी भावले, मोहन जाधव, गौतम कोंगळे आदी उपस्थित होते.

CITU delegation
Nashik Politics : केंद्र सरकार शेतकऱ्यांचा विचार करणार, की ग्राहकांचा?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com