SP Dr. Pravin Munde with Maratha organisation leaders.
SP Dr. Pravin Munde with Maratha organisation leaders. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maratha : पीआय किरणकुमार बकालेंच्या बडतर्फीसाठी मराठा समाज आक्रमक

Sampat Devgire

जळगाव : जिल्‍हा पोलिस (Jalgaon Police) दलाच्या स्थानिक गुन्हेशाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले (Kirankumar Bakale) यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे तीव्र पडसाद आज जिल्ह्यात (Jalgaon) उमटले. त्यांच्या वक्तव्याची ऑडीओ क्लिप व्हायरल (Social media) झाल्यानंतर आज राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांच्या (Socila organisation) पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत ‍पोलिस अधीक्षक कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन केले. बकालेंच्या बडतर्फीची मागणी केली. (Maratha organisation as well political parties deemands suspension Of PI Bakale)

गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी त्यांच्या हजेरी मास्तरशी मोबाईलवर बोलताना मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची ध्वनीफीत जिल्‍ह्‍यातील सर्वच राजकीय नेत्यांसह माध्यम प्रतिनिधीकडे पोहचली.

पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखत रात्री साडेअकराला निरीक्षक बकाले यांची तत्काळ उचलबांगडी करत नियंत्रण कक्षात बदली केली. दिवस उजाडताच चाळीसगाव, मुक्ताईनगरसह संपूर्ण जिल्‍ह्‍यात या व्हायरल ऑडीओ क्लिपचे पडसाद उमटू लागले. राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, छावा, मराठा महासंघासह इतर विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्यांनी संध्याकाळी जिल्‍हापोलिस अधीक्षकांचे कार्यालय गाठले.

राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, मंगला पाटील, भीमराव मराठे, मुकूंद सपकाळे,विनोद देशमुख यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत पोलिस अधीक्षक कार्यालय दणाणून सोडले.

पोलिस कर्मचारीही आक्रमक..

बकालेंची बदली होताच त्यांनी रात्रीच डायरीवर नोंद घेत काढता पाय घेतला होता. दिवस उजाडताच ऑडिओ क्लिप महाराष्ट्रातील विवीध व्हॉटसॲप ग्रृपसह पेलिसांच्या ग्रृपवर व्हायरल झाली. घडल्या प्रकाराबाबत गुन्हेशाखेतील कर्मचाऱ्यांना कळाल्यावर गटा-गटाने संतप्त कर्मचारी पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात थांबून चर्चा करत करताना आढळून आले. कर्मचाऱ्यांचा संताप इतका प्रखर होता की, चुकूनही बकाले त्यांच्या तावडीत सापडले असते तर कदाचित मोठा अनर्थ घडला असता.. इतपत संताप व्यक्त करण्यात येत होता.

महाराष्ट्रात क्लिप व्हायरल..

किरणकुमार बकाले यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याची ऑडीओ क्लिप दिवस उजाडताच महाराष्ट्रभर व्हायरल झाली. संपुर्ण महाराष्ट्रातून जळगावच्या पोलिस अधिकाऱ्यांकडे चौकशीचे फोन खणखणू लागले.

घडलेला प्रकार निंदनीय असून मी व्यक्तीशः याचा तीव्र शब्दात निषेध करतो. या प्रकाराबाबत वरिष्ठांची चर्चा करुन किरणकुमार बकालेंवर कठोर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यांची चौकशी जळगाव जिल्‍ह्‍याबाहेर करण्यात यावी असेही नमूद केले आहे. मध्यरात्रीपर्यंत यावर वरिष्ठ पातळीवर नक्कीच निर्णय होईल.

- डॉ. प्रवीण मुंढे, पोलिस अधीक्षक, जळगाव जिल्हा

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT