Chandwad Maratha Agitation : मराठा आरक्षणासाठी राज्य शासनाने दिलेली चाळीस दिवसांची मुदत मंगळवारी संपली. या कालावधीत काहीही ठोस निर्णय न झाल्याने चांदवड तालुक्यात आजपासून नव्याने आंदोलन सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. (Maratha Community given strong warning on Reservation issue to State Government)
या संदर्भात माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड (Nashik) तालुक्यात आंदोलन होणार आहे. या आंदोलनामुळे (Maratha) भाजपचे (BJP) आमदार डॉ. राहुल आहेर (Rahul Aher) यांची राजकीय डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत.
यासंदर्भात चांदवड तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते एकत्र आल्याचे दिसले. सर्वांनी या विषयावर आपल्या भावना तीव्र असल्याचे स्पष्ट केले. राज्य सरकारने याबाबत चाळीस दिवसांची मुदत घेतली होती. या कालावधीत त्यांनी फारशा हालचाली केल्या नाहीत. उलट हे आंदोलन मोडून काढण्याचेच प्रयत्न झाले. मात्र, हा विषय राजकीय नव्हे तर समाजाच्या भवितव्याचा आहे, असे स्पष्ट करण्यात आले.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी शासनाला दिलेली मुदत २४ ऑक्टोबरची संपली. आरक्षणप्रश्नी कोणताही निर्णय अथवा हालचाल न केल्याने मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. या विषयावरील लढाई पुन्हा नव्याने लढण्याची तयारी केली असून, मागणी पूर्ण होईपर्यंत बेमुदत साखळी उपोषणाचा इशारा माजी आमदार कोतवाल यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आला.
या वेळी दुचाकी रॅली काढण्यात आली. उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय जाधव, राष्ट्रीय काँग्रेसचे चांदवड शहराध्यक्ष नंदकुमार कोतवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे चांदवड शहराध्यक्ष प्रकाश शेळके, बाजार समितीचे संचालक गणेश निंबाळकर, सुनीलआण्णा सोनवणे, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष कैलास कोतवाल, मनसेचे नितीन थोरे, कांदा व्यापारी सचिन कोतवाल, गणेश ठाकरे, अनिल कोतवाल, विजय गांगुर्डे, आदेश शेळके आदींसह मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.