Chhagan Bhujbal News : भुजबळांच्या मदतीला भाजपचे मित्र, अजित पवार गटाचे कोणी दिसेना!

OBC Leaders in Maharashtra : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे.
Chhagan Bhujbal & Dy. CM Ajit Pawar
Chhagan Bhujbal & Dy. CM Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Maratha reservation News : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी याबाबत घेतलेल्या भूमिकेला मंत्री छगन भुजबळ यांनी अनेकदा आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये भाजपचे मित्र असलेल्या पक्षाचे नेते भुजबळ यांच्या मदतीला आल्याचे दिसते. (Chhagan Bhujbal clears his roll in the interest of OBC on reservation)

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) प्रश्नावर विविध राजकीय पक्ष बचावात्मक भूमिका घेताना दिसतात. या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अजित पवार (Ajit Pawar) गटाचे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी वेगळी भूमिका घेतलेली आहे.

Chhagan Bhujbal & Dy. CM Ajit Pawar
Maratha Reservation News : मनोज जरांगे पाटील आता बराक ओबामा, मोदींच्या पंक्तीत!

भुजबळांना पाठिंबा देण्यासाठी नेते आले पुढे

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या विषयावर सुरू केलेल्या आंदोलनाचा पोलिसांच्या दडपशाहीमुळे अचानक भडका उडाला. त्याला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळाला. त्यानंतर राज्य सरकारला त्यापुढे झुकावे लागले. प्रश्न सोडविण्यासाठी चाळीस दिवसांचा कालावधी देण्यात आला. यामध्ये मराठा हे कुणबी आहेत. कुणबी हे ओबीसी आहेत. त्यामुळे मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र व आरक्षण मिळावे ही जरांगे पाटील यांची भूमिका आहे.

जरांगे पाटील यांच्या भूमिकेला विरोध करीत ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण नको, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली. त्यात भुजबळांवर टीका झाल्यावर भाजपचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (ए) नेते व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले अशा विविध नेत्यांनी भुजबळ यांना पाठिंबा दिला. त्यांचा बचाव करण्याचादेखील प्रयत्न केला.

सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर वळणावर पोहोचला आहे. मात्र, सत्तेत असलेले, त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून शिंदे सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार यांनी यावर भाष्य करणे टाळता कसे येईल, यावर भर दिला. त्यांच्या गटाचे कोणीही नेते भुजबळ स्वपक्षाचे असूनदेखील त्यांच्या समर्थनार्थ उघडपणे पुढे आलेले नाहीत. त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला आहे.

Chhagan Bhujbal & Dy. CM Ajit Pawar
Maratha Reservation News : मनोज जरांगे पाटील आता बराक ओबामा, मोदींच्या पंक्तीत!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com