Maratha community agitation
Maratha community agitation Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maratha; `मराठा` कार्यकर्त्यांनी मंगलप्रभात लोढांच्या प्रतिमेला जोडे मारले

Sampat Devgire

चाळीसगाव : मुख्यमंत्र्यांच्या (CM Eknath Shinde) बंडाची तुलना छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याशी केल्याप्रकरणी पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांचा जाहीर निषेध नोंदवून सकल मराठा (Maratha) समाजाच्यावतीने जोडोमारो आंदोलन करण्यात आले. (Maratha community protest against BJP Minister Lodha in Chalisgaon)

शिवप्रताप दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हिंदीतून भाषण करताना औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना पकडून आग्रा येथे डांबले होते. शिवरायांनी स्वतःसाठी नव्हे तर हिंदवी स्वराज्यासाठी तेथून सुटका करून घेतली. अशाच प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रोखण्याचे खूप प्रयत्न झाले. ज्या प्रमाणे आग्राच्या सुटकेतून छत्रपती शिवाजी महाराज सुटले त्याचप्रमाणे शिंदेही बाहेर आले, असे विधान त्यांनी केले.

यामुळे महाराजांच्या आग्राच्या सुटकेची तुलना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी करत अवमान केल्याने मंगलप्रभात लोढा यांच्याविरोधात तमाम शिवभक्तांमध्ये रोष व्यक्त होत असून, लोढा यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला सकल मराठा समाजाच्यावतीने गुरुवारी तहसील कार्यालयासमोर जोडेमारो आंदोलन केले. या अगोदर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, आता पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा केलेला अवमान शिवभक्त कदापी सहन करणार नाही. असा इशाराही यावेळी देण्यात आला.

हे आंदोलन रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली छोटु अहिरे ,संजय कापसे, खुशाल बिडे, खुशाल मराठे, ॲड. राहुल जाधव, योगेश पाटील, भाऊसाहेब पाटील, मुकुंद पवार, भरत नवले, स्वप्नील गायकवाड, राजेंद्र पाटील, दीपक देशमुख, गोपाल पाटील, विकास पवार, नामदेव तुपे, संजय पाटील, मोतीराम मांडोळे यांच्यासह शिवप्रेमींनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT