Chhagan Bhujbal & Adv. Kailas Khandbahale Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maratha Reservation : ‘भुजबळ साहेब, तुमचे घर काचेचे आहे, हे विसरू नका’

Sampat Devgire

OBC reservation review petition : ओबीसी घटकांसाठी जाहीर केलेले आरक्षण हे एक मोठे गौडबंगाल आहे. त्या विरोधात मी २०१८ मध्ये जनहीत याचिका दाखल केली होती. ती सध्या सुनावणीला आली, हा सुखद योगायोग आहे, असे याचिकाकर्ते, नाशिक येथील कैलास खांडबहाले यांनी सांगितले. (Nashik`s Kailas Khandbale says, Leader like Chhagan Bhujbal is harmfull for OBC)

मराठा समाज आरक्षणाचे समर्थक, (Maratah Reservation) नाशिकचे (Nashik) कैलास खांडबहाले यांनी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर टिका केली आहे. भुजबळ यांच्यासारखे नेते केवळ राजकीय स्वार्थासाठी समाजात दुही पसरवत आहे.

याबाबत श्री. खांडबहाले म्हणाले, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे घऱ काचेचे आहे. मात्र दुसऱ्याच्या घरावर दगड भिरकावत आहेत. त्यांनी त्यांचे आरक्षण कसे मिळाले, याचा अभ्यास करावा. वरवरचे मुद्दे पुढे करून समाजात दुही निर्माण करू नये. स्वतःच्या अस्तित्वासाठी राज्याच्या सौहार्द पूर्ण वातावरण बिघडवू नये.

ते म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरुद्ध स्वतःला ओबीसी नेता म्हणून घेणारे मंत्री भुजबळ यांना खरे वास्तव माहिती आहे. त्यामुळेच त्यांनी आमच्या याचिकेचा धसका घेतला आहे. अखेर हायकोर्टात ङस्तक्षेप याचिका दाकल करावी लागली.

मराठा समाजाच्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात ओरड करताना मंत्री भुजबळ सध्या ठिकठिकाणी सोशल मीडियावर तसेच विविध वृत्तवाहिन्यांवर संताप व्यक्त करताना दिसून येत आहेत. मात्र त्यांना हे चांगले ठाऊक आहे, की आपल्या दिव्याखाली अंधार आहे.

नाशिकचे तरुण अॅड. कैलास खांडबहाले यांनी ओबीसीच्या फुगीर आरक्षणाच्या विरुद्ध १९०/२०१८ ही जनहीत याचिका दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच ही याचिका ट्रॅक करून घेतली आहे. याचिका दाखल करून घेतल्याने त्यावर उच्च न्यायालयाने राज्य शासनाला नोटीस बजावली आहे.. १९९४ मध्ये ओबीसी समाजांना आरक्षण देताना काय काय पुरावे सादर ग्राह्य धरण्यात आले होते, सादर करण्याचे आदेश दिले आहेत. येत्या ३ जानेवारीला त्याची पुढील सुनावणी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT