Solapur: शिंदे सरकारकडून शेतकऱ्यांना दिवाळीचं मोठ गिफ्ट; आठ सवलती मिळणार

CM Eknath Shinde News : पीक कर्ज वसुलीला स्थगिती मिळाली आहे.
Devendra Fadanvis, Ajit Pawar, Eknath shinde
Devendra Fadanvis, Ajit Pawar, Eknath shindesarkarnama
Published on
Updated on

Solapur : दिवाळीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे राज्यावर दुष्काळाचं तीव्र सावट आहे. दुष्काळाची भीषणता आत्तापासून जाणवू लागली आहे. यंदा सोलापूर जिल्ह्यात सरासरी ७० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्याने याचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. पीक सर्व्हेनंतर राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील पाच तालुक्यात दुष्काळ जाहीर केला.

Devendra Fadanvis, Ajit Pawar, Eknath shinde
Kapil Patil: गायकवाड, शिंदे समर्थकांमधील वादावर कपिल पाटील म्हणाले,'आमच्यात मतभेद आहेत, पण..

लोकप्रतिनिधींची वाढती मागणी लक्षात घेऊन राज्य सरकारने दुसऱ्या टप्प्यात नंतर उर्वरित सहा तालुक्यातही दुष्काळ जाहीर केला आहे. यामुळे आता संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाली असून पीक कर्ज वसुलीला स्थगिती मिळाली आहे.

दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, उत्तर सोलापुर,पंढरपूर, मंगळवेढा,आणि मोहोळ यात तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला आहे. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर नियमानुसार शासनाकडून आठ सवलती मिळणार आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावर्षी जिल्ह्यात सरासरी ७० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्याने शेती तसेच पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली. खरीप पिकांबरोबर रब्बी हंगामातील पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.

Devendra Fadanvis, Ajit Pawar, Eknath shinde
BJP News: भाजप महावितरणच्या कार्यालयात 'फटाके फोडणार';"हिंदूंच्या सणातच, असे प्रकार का होतात?

राज्य सरकारने उर्वरित सहा तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. यासाठी लोकप्रतिनिधींचा दबाव वाढत होता. या पार्श्वभूमीवर सरकारने सकारात्मक निर्णय घेऊन लाखो शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. जिल्ह्यातील बार्शी, माळशिरस, सांगोला, माढा आणि करमाळा या तालुक्यात यापूर्वीच दुष्काळ जाहीर झाला आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती.

Devendra Fadanvis, Ajit Pawar, Eknath shinde
Sanjay Raut: अजितदादांना राऊतांचा चिमटा; आजारी माणूसच दुसऱ्यांना भेटायला जात आहे...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com