Manoj Jarange, Radhakrishna Vikhe Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maratha Reservation Issue : ‘जरांगेंनी समजून घ्यावे’; विखे पाटलांनी सरकारची बाजू मांडली

Radhakrishna Vikhe Patil : राधाकृष्ण विखे पाटलांकडून चर्चेचे आवाहन...

संपत देवगिरे

Hunger Strike of Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आपण ठाम असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. या विषयावर शासनाशी चर्चेला जाणार नसल्याचा त्यांचा सूर आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सध्या राज्यात कोंडी निर्माण झाली आहे. २० जानेवारीपासून ते मुंबईत उपोषण करणार आहेत. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.

जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी या प्रश्नावर आंदोलन करण्यावर ठाम असल्याचे सांगून राज्य शासनाशी (Maharashtra Government) कोणतीही चर्चा नाही, असे म्हटले होते. याबाबत राज्याचे महसूल मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी जरांगे यांना चर्चा टाळू नये, असे आवाहन केले आहे.

आंदोलन करणे हा प्रत्येकाचा अधिकार असल्याचे सांगून विखे पाटील म्हणाले, आंदोलनातून प्रश्न सोडवण्यासाठी चर्चा करावीच लागते. चर्चेतूनच मार्ग निघतो. मराठा आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. राज्य शासन यावर गंभीर आहे. विविध प्रकारे हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे जरांगे यांनी चर्चेला नकार देऊ नये, चर्चा आवश्यक आहे हे त्यांनी समजून घ्यावे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आरक्षणाचा (Reservation) प्रश्न देशभर चर्चेत आहे. विविध राज्यात देखील काही समाजांना आरक्षण देण्याबाबत आंदोलन आणि चर्चा दोन्हीही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाचा आणि केंद्राचा हेतू सकारात्मक निवाडा व्हावा या प्रश्नावर मार्ग निघावा असाच आहे. त्यात कोणीही वेगळे मत मांडलेले नाही, असेही विखे पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT