Karad News : माजी सहकारमंत्र्यांच्या नावाची पतसंस्था अवसायनात; संस्थापक परदेशात फिरायला

Yashwantrao Mohite : कराडची यशवंतराव मोहिते पतसंस्था अडचणीत...
Indrajeet Mohite
Indrajeet MohiteSarkarnama

Indrajeet Mohite : राज्याच्या सहकाराला दिशा देणारे सहकार मंत्री म्हणून आजही यशवंतराव मोहिते यांचे नाव घेतले जाते. मात्र त्यांच्या नावाने त्यांच्याच मुलाने स्थापन केलेली पतसंस्था अवासायनात निघाली आहे. ठेवीदार अडचणीत असताना संस्थेचे संस्थापक इंद्रजीत मोहिते परदेश पर्यटन करत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

कराड (Karad) तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते (Yashwantrao Mohite) नागरी सहकारी पतसंस्था आर्थिक अडचणीत असल्याची चर्चा गेले अनेक दिवस सुरु होती. या संस्थेच्या 14 शाखा आहेत. एकूण 34 कोटीच्या ठेवी आहेत. कराड आणि वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांचे पैसे या संस्थेत आहेत, मात्र गेल्या काही महिन्यांपासून ठेवी परत दिल्या जात नसल्याची तक्रार होती.

Indrajeet Mohite
Nashik News : पेट्रोल पंप बंद ; राधाकृष्ण विखे - पाटील हस्तक्षेप करणार ?

अखेर या संस्थेवर अवसायक नेमण्याचा आदेश सहकारी संस्थाचे विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांनी काढला आहे. या संस्थेचे लेखापरीक्षण तीन वर्ष केलेलं नाही तसंच अगोदर केलेल्या लेखापारीक्षणातही त्रुटी आढळल्या आहेत. या कारणाने अवसायक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लेखापरीक्षक कमलेश पाचपुते यांना आवसायक म्हणून नेमले आहे. आता अवसायक नेमल्याने ठेवीदारांचे धाबे दणाणले आहेत.

यशवंतराव मोहिते यांनी सहकार मंत्री असताना सहकारात (Co-Operative) शिस्त रहावी म्हणून अनेक कायदे केले. मात्र त्यांच्याच नावाने असलेल्या संस्थेत आर्थिक शिस्त न पाळल्याने संस्था अडचणीत आली आहे. संस्था अडचणीत असताना संस्थापक इंद्रजीत मोहिते (Indrajeet Mohite) परदेशवारीवर आहेत. त्यामुळे ठेवीदारांचा संताप आणखीच वाढला आहे.

Indrajeet Mohite
Bhandara Blast : वरठीच्या सनफ्लॅग कंपनीत स्फोट, तीन कामगार भाजले; नागपुरात उपचार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com