Mla Sangram Jagtap & Nilesh Lanke News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maratha Reservation News : महायुतीतील आमदार जगताप, लंकेंच्या मराठा आरक्षणासाठी वेगवेगळ्या भूमिका !

Amol Jaybhaye

प्रदीप पेंढारे

Ahmednagar News : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण आंदोलन सुरू असून, राज्यभर मराठा समाजाकडून आंदोलन सुरू आहे. राज्यातील काही भागात आंदोलन आक्रमक स्वरूप आले आहे. नेत्यांना गावबंदी, सभा बंदी, कार्यक्रम उधळून लावण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. यामुळे मराठा समाजाच्या आंदोलनाला आता राजकीय नेते पाठिंबा देत आहेत. नगर जिल्ह्यात तरी सध्या तसे चित्र आहे. यातच राज्यात महायुतीत सत्तेत असलेल्या अजित पवार गटातील दोन आमदारांच्या मराठा आरक्षणावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणावर चर्चा करत केंद्राकडे शिफारस करावी, अशी भूमिका मांडली आहे, तर पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नीलेश लंके यांनी मराठा आरक्षण न मिळाल्यास हिवाळी अधिवेशन मराठा आमदाराकडून बंद पाडण्याची तयारी दर्शवली आहे. आमदार जगताप आणि लंके यांच्या मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) वेगवेगळ्या भूमिका समोर आल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. नेमकी कोणती भूमिका मराठा समाजाच्या आंदोलकांनी स्वीकारायची अशी चर्चा सुरू झाली आहे.

नगर तहसील कार्यालयात गेल्या तीन दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज आंदोलन करत आहे. या आंदोलनात आमदार जगताप आणि नगर महापालिकेचे नगरसेवक सहभागी होत पाठिंबा दिला होता. मावळ कार्ला येथे मराठा समाजाने सुरू केलेल्या आंदोलनाला आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी भेट देत पाठिंबा दिला. 'मराठा आरक्षणावर निर्णय न झाल्यास, मराठा आमदारांकडून हिवाळी अधिवेशन बंद पाडण्याची तयारी आहे', असे आमदार लंके यांनी म्हटले आहे.

प्रकाश आंबेडकर यांची भेट

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे नगरमध्ये होते. मराठा समाजाच्या आरक्षणावरून मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीने काही पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील लढत असलेल्या लढाईला माझा पाठिंबा आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिल्याबद्दल मराठा समाजातर्फे आंबेडकर यांचा सत्कार करण्यात आला.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT