Maratha Reservation News : मराठा आरक्षणाबाबत दोन दिवसांत तोडगा निघणार...; आरोग्यमंत्री सावंतांचे मोठे विधान

Maratha Reservation, Tanaji Sawant News : मराठा आरक्षणाबाबत येत्या एक-दोन दिवसात तोडगा निघण्याची शक्यता
Tanaji Sawant News
Tanaji Sawant NewsSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation Andolan : अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र आणि त्याआधारे आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. त्यासोबतच गावोगावी नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. यातून विरोधीपक्षाचे आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार खासदारही सुटलेले नाहीत. त्यावर तुळजापुरात बोलताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी मराठा आरक्षणाबाबत येत्या एक-दोन दिवसात तोडगा निघण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा आरक्षणबाबत राज्य सरकार लक्ष ठेवून आहे. हायकोर्टचे न्यायाधिश हे त्या-त्या ठिकाणी जाऊन तपासणी करत आहेत. त्यावर गेल्या काही दिवसांपासून काम सुरू आहे. अशा प्रकारचा निर्णय घ्यायचा असेल तर साधक-बाधक विचार राज्य सरकार करत आहे. राज्य सरकार अत्यंत कळकळीने या विषयावर लक्ष ठेवून आहे. आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार व केंद्रातील मंत्री यांनी संपूर्ण लक्ष या विषयात घातले आहे. त्यामुळे यावर लवकरच तोडगा निघेल, असे सावंत यांनी स्पष्ट केले.

Tanaji Sawant News
Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या हालचालींना वेग; उपसमितीची मंत्रालयात होणार बैठक!

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी शनिवारी तुळजापुर येथे सुरू असलेल्या महाआरोग्य शिबिरास भेट दिली यावेळी ते पत्रकांराशी बोलत होते. तुळजापुर येथे यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी घाटाच्या पायथ्याशी महाआरोग्य शिबिर सुरू करण्यात आले आहे. या शिबिराचा यात्रेसाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ घेतला आहे.

तुळजापुरात नवरात्रानिमित्त अश्विन पौर्णिमेला मोठी यात्रा भरते. या यात्रेसाठी तुळजापुरात मोठ्या प्रमाणात भाविक पायी चालत तुळजापुरात तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येत असतात. त्या भाविकांच्या आरोग्याची तपासणी करण्याच्या दृष्टीने सावंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात मोठ्या संख्येने भाविकांची तपासणी केली जाणार आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Tanaji Sawant News
MP Ramdas Tadas : ...तर आरक्षणासाठी तेली समाजही रस्त्यावर उतरेल, रामदास तडस गरजले !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com