प्रदीप पेंढारे -
Ahmednagar News: नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या राहाता विधानसभा मतदारसंघात मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झाले आहेत. राहाता, शिर्डीमध्ये सोमवारी बंद पाळण्यात आला. तशी सकल मराठा समाजाकडून बंदीची हाक देण्यात आली होती. आज बंदवेळी जमलेल्या सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या छायाचित्रांना काळे फासून जोडे मारत निषेध व्यक्त केला.
मराठा आरक्षणासाठी गेल्या सहा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. सरकार मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करताना दिसत नाही. ठोस भूमिका घेताना दिसत नसल्याने आज राहाता, शिर्डीत पुकारलेल्या बंदमध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटले.
राहात्यातील ग्रामदैवत वीरभद्र महाराज यांच्या मंदिरासमोर मराठा समाज आज बंदवेळी एकत्र आला होता. जमलेले आंदोलक जोरदार घोषणाबाजी करत होते. मराठा आंदोलकांनी बसस्थानकाकडे धाव घेतली. यावेळी आंदोलक आक्रमक होते. बसवरील शासकीय जाहिरातवर असलेल्या नेत्यांच्या छायाचित्रांना काळे फासून जोडे मारले. पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना शांत केले.
हक्काचे आरक्षण मागत आहोत. ते द्यावाच लागेल. मराठा आरक्षणावर लवकर तोडगा न निघाल्यास राज्यापेक्षा राहाता तालुक्यात तीव्र आंदोलन करू, असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला.
मराठा आंदोलनावर केंद्र सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. याचाही निषेध यावेळी सकल मराठा समाजाकडून नोंदवण्यात आला. या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज दिवसभर बाजारपेठेतील सर्व व्यवहार बंद होते. कोणताही अनुचित प्रकार नको म्हणून राहाता शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.