Hemant Patil Resign: हेमंत पाटलांचा राजीनामा लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयाने स्वीकारला; पण ओम बिर्लांच्या भूमिकेकडे लक्ष

Maratha Reservation: लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयाने हेमंत पाटलांचा राजीनामा स्वीकारला असला तरी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे स्वीकारणार का ?
Hemant Patil Resign
Hemant Patil ResignSarkarnama
Published on
Updated on

Delhi News : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच पेटला असून, राज्यभरात ठिकठिकाणी मराठा समाज आक्रमक झाला आहे, तर राजकीय नेत्यांना अनेक ठिकाणी गावबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांना आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागत असतानाच हिंगोलीचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी रविवारी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला.

यानंतर हेमंत पाटील यांनी सोमवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कार्यालयाकडे खासदारकीचा राजीनामा सुपूर्त केला. मात्र, या वेळी लोकसभा अध्यक्ष उपस्थित नव्हते. सध्या लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयाने त्यांचा राजीनामा स्वीकारला असला तरी लोकसभा अध्यक्ष हे हेमंत पाटलांचा राजीनामा स्वीकारणार का, ते पाहणं महत्वाचं असणार आहे.

Hemant Patil Resign
Maratha Reservation News : मराठा आंदोलन आक्रमक; तर...तहसीलच्या प्रवेशद्वारावर बसून आंदोलन करणार

सोमवारी लोकसभा अध्यक्ष हे कार्यालयात उपस्थित नसल्यामुळे आता हेमंत पाटील मंगळवारी पुन्हा अध्यक्षांची भेट घेणार आहेत. त्यामुळे लोकसभा अध्यक्ष काय भूमिका घेतात, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मराठा आरक्षणावरून सध्या राज्यात वणवा पेटला आहे. त्यामुळे मराठा समाजाची जनभावना लक्षात घेत खासदार हेमंत पाटलांनी थेट राजीनामा दिला. त्यांच्या राजीनामा दिल्यानंतर राज्यात चर्चांना उधाण आलं.

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीत गेल्या सहा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांची तब्येत खालावत चालली असून, आंदोलक आता आक्रमक होताना दिसत आहेत. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. त्यामुळे सरकार आता मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर काय तोडगा काढतं, हे पाहणं महत्त्वाच़ं असणार आहे.

Edited By- Ganesh Thombare

Hemant Patil Resign
Beed News : मराठा आरक्षणासाठी अजित पवार गटाच्या बीड जिल्हाध्यक्षांसह परळी विधानसभा अध्यक्षांचा राजीनामा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com