Manoj Jarange Patil & Dr. Radhakrishna vikhe Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maratha reservation : जरांगे पाटील यांनी थोडा संयम ठेवावा!

Maratha Reservation politics, Radhakrishna Vikhe Patil express his view-महसूलमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत व्यक्त केले मत

Sampat Devgire

Maratha reservation News : मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या राज्यभर चर्चेत आहे. त्याबाबत विविध नेत्यांची वक्तव्ये येत आहेत. या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपले मत व्यक्त केले. (Revenue Minister Dr. Radhakrishna Vikhe Patil express his view on current situation)

मराठा आरक्षणावर (Maratha reservation) गोंधळ होईल, अशी विधाने करण्याचे टाळले पाहिजे. याबाबत सरकार (Maharashtra Government) आपले काम करीत आहे. त्यामुळे त्यांना या विषयावर थोडा वेळ दिला पाहिजे, असे महसूलमंत्री डॉ. विखे पाटील (Dr. Vikhe Patil) म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केले होते. त्यावर चर्चेतून तोडगा काढण्यात आला. या वेळी राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर दुसऱ्यांदा वेळ वाढवून देण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर विविध मंत्री, नेत्यांकडून विविध विधाने केली गेली आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनीदेखील त्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जरांगे पाटील यांनी पुन्हा महाराष्ट्राचा दौरा सुरू करणार असल्याचे म्हटले आहे.

यासंदर्भात डॉ. विखे पाटील म्हणाले, या विषयावर विविध वक्तव्ये येत आहेत. त्यावर मी मत व्यक्त करणार नाही. मात्र, राज्यातील वातावरण बिघडेल, अशी विधाने टाळली पाहिजेत. यासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनीदेखील संयम ठेवावा. राज्य सरकार या विषयावर अतिशय गांभीर्याने काम करीत आहे. त्यांना त्यांचे काम करू द्यावे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT