NCP Politics : संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ का जाहीर होत नाही?, राष्ट्रवादी काँग्रेसचा सवाल!

Drought in Nashik : संपूर्ण तालुक्यात दुष्काळ जाहीर होईपर्यंत बागलाणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा लढा सुरूच राहणार!
NCP Ex MLA Deepika Chavan
NCP Ex MLA Deepika ChavanSarkarnama
Published on
Updated on

Nashik Latest News : बागलाण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मतदारसंघातील दुष्काळी परिस्थितीवरून भाजपचे आमदार दिलीप मंगळू बोरसे यांना चांगलेच फैलावर घेतले आहे. तुकड्या तुकड्यांनी जनतेच्या हालअपेष्टा का वाढवता, संपूर्ण तालुक्यात दुष्काळ का जाहीर होत नाही, असा सवाल केला आहे. (NCP leaders Questioned BJP MLA Dilip Borase on Drought situation)

राज्य सरकारच्या (Maharashtra Government) मंत्री गटाच्या उपसमितीने फेरआढावा घेऊन मंडळनिहाय दुष्काळ (Drought) जाहीर केला आहे. त्यामुळे भाजप (BJP) आमदार अडचणीत, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अधिकच आक्रमक झाले आहेत.

NCP Ex MLA Deepika Chavan
Maharashtra Politics : मराठवाड्याचे पाणी अडवण्यासाठी अमृता पवारही आल्या पुढे!

बागलाण तालुका विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, माजी आमदार दीपिका चव्हाण (शरद पवार गट) दुष्काळाच्या परिस्थितीवरून रोज नवे प्रश्न करीत आहेत. विरोधक दुष्काळाच्या स्थितीमुळे आक्रमक झाले आहेत. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्रदेखील लिहिले आहे. एव्हढ्यावर न थांबता त्यांनी भाजपच्या आमदारांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.

मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत बागलाण तालुक्यातील सटाणा, नामपूर, ताहाराबाद, जायखेडा, वीरगाव, मुल्हेर हे सहाच मंडळे शासनाने दुष्काळसदृशच्या यादीत जाहीर केले. वास्तविक संपूर्ण तालुका दुष्काळी जाहीर करणे आवश्यक असताना मुंजवाड, किकवारी, साल्हेर, डांगसौंदाणे, टेंभे, ब्राह्मणगाव या मंडळांना वगळण्याचा शासनाचा निर्णय चुकीचा आहे. संपूर्ण तालुका दुष्काळी जाहीर होत नाही, तोपर्यंत माझा लढा सुरू राहील, असा संतप्त इशारा बागलाणच्या माजी आमदार व राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण यांनी दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तालुक्यातील ही मंडळे दुष्काळी जाहीर का होऊ शकली नाहीत. सरकारच्या या कृतीबाबत संभ्रम निर्माण झाला असून, ‘एकाला तुपाशी दुसऱ्याला उपाशी’ ठेवण्यामागे सरकारचा नेमका हेतू काय आहे, हे समजले नाही, असे सांगत त्यांनी सत्ताधारी भाजपचे आमदार करतात तरी काय? असा प्रश्न केला आहे. बागलाणची जनता पिण्याच्या पाण्यासाठी शेतकरी आपल्या पिकांबाबत अत्यंत मोठ्या संकटात सापडले आहेत आणि आमदार, खासदार मोठ मोठ्या घोषणा करण्यात व्यस्त आहेत. त्यांनी घोषणा थांबवून दुष्काळ जाहीर करून दिलासा देणारी कामे सुरू करावीत, अशी मागणी त्यांनी केली.

NCP Ex MLA Deepika Chavan
Tanaji Sawant News : आरोग्यमंत्र्यांच्या या सरंजामी देहबोलीचे करायचे काय?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com