Devendra Fadnavis, Chhagan Bhujbal, Amruta Pawar  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maratha Reservation : येवल्यातील मराठा आंदोलकांवरील गुन्ह्यांचे प्रकरण गेले थेट फडणवीसांकडे!

Maratha Reservation Protest Amruta Pawar Will Meet Devendra Fadnavis : मराठा आंदोलकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत भाजप नेत्या अमृता पवार गृहमंत्र्यांना भेटणार...

संपत देवगिरे : सरकारनामा

Chhagan Bhujbal Vs Maratha Protest : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आंदोलकांतील वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांबाबत या आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

मंत्री भुजबळ यांनी १२ डिसेंबरला आपल्या येवला विधानसभा मतदारसंघात दौरा केला होता. अवेळी झालेल्या पावसामुळे शेतीचे नुकसान झाल्याने पाहणी करण्यासाठी ते आपल्या मतदारसंघात गेले होते. यावेळी मतदारसंघातील शेतकरी तसेच मराठा आंदोलकांनी या दौऱ्याला प्रखर विरोध केला होता.

मंत्री भुजबळ हे पाहणी करण्यासाठी गेले असता, त्यांना मतदारसंघात ठीक ठिकाणी विरोधाला सामोरे जावे लागले. याबाबत मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ अनेक आंदोलकांनी भुजबळ यांच्या दौऱ्याला जाहीरपणे विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी काळे झेंडे दाखवून भुजबळ यांच्या विरोधाच्या घोषणा देण्यात आल्या. त्यांना विरोध केल्याने नुकतेच एका वाहिनीच्या पत्रकारासह मराठा आरक्षण आंदोलनाचे स्थानिक नेते डॉक्टर सुजित गुंजाळ यांसह विविध कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. याबाबत पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे मराठा आंदोलकांमध्ये नाराजीची भावना आहे.

भाजपच्या नेत्या आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार यांनी या आंदोलकांची माहिती घेतली. पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे आगीत तेल ओतण्याचे काम करू शकते. येवला मतदारसंघात शांतता प्रस्थापित होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे याबाबत अमृता पवार यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाशी संपर्क केला आहे. संबंधित पोलीस ठाण्याला सूचना देऊन चुकीच्या पद्धतीने दाखल असलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अमृता पवार यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यासंदर्भात तातडीने गृहमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन हा विषय मांडण्यात येईल. आंदोलकांवरील गुन्हे घटना घडल्यानंतर बऱ्याच दिवसांनी दाखल झाले. भुजबळ यांचा दौरा गोपनीय नव्हता. सोशल मीडियावर या दौऱ्याची चर्चा आधीच होती. त्यामुळे या संदर्भात दाखल केलेले गुन्हे पूर्णतः अयोग्य आहेत. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेण्याची गरज आहे. तशीच भूमिका वरिष्ठ व जाणकार नेत्यांनी घ्यावी. अशी येवल्यातील नागरिकांची अपेक्षा आहे, असे अमृता पवार यांनी 'सरकारनामा'ला सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT