Nagar News : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी राज्यभर विविध मार्गांनी आंदोलने सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला शांततेने साखळी उपोषण आंदोलन करण्याचा सल्ला वारंवार दिला असला तरी बीड, जालन्यासह राज्यात ठिकठिकाणी आंदोलनाला हिंसक स्वरूप आले आहे. त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था हाताबाहेर चालल्याचे चित्र निर्माण झाले. त्या पार्श्वभूमीवर नगर तालुक्यातील निमगाव वाघा इथल्या साखळी उपोषण आंदोलनस्थळी गावातील तरुणांनी रक्तदान करत आंदोलनाला सकारात्मक दिशा दाखवली आहे. (Youth of Nagar gave a positive direction to Maratha Resevertion movement by donating blood)
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी निमगाव वाघा (ता. नगर) येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणात ग्रामस्थांसह युवकांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराला गावातील युवकांचा प्रतिसाद मिळाला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ग्रामस्थांचे साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणात गुरुवारी (ता. २ नोव्हेंबर) रक्तदान करून मराठा आरक्षणाची मागणी करण्यात आली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आरक्षणासाठी मराठा समाजातील अनेक युवकांनी आत्महत्या केल्या. तरीदेखील सरकारला जाग आलेली नाही. आंदोलनाने फक्त सरकार जागे झाले असून, आरक्षणाचा प्रश्न ते गंभीरतेने घेत नाही. मंत्रालयात बैठका फक्त खुर्चा टिकवण्यासाठी सुरू असून, त्यांचे मराठा आरक्षणाकडे लक्ष नाही, असा आरोप मराठा महासंघाचे नगर तालुकाध्यक्ष पहिलवान नाना डोंगरे यांनी केला.
या शिबिरात विजय डोंगरे, भरत बोडखे, भाऊसाहेब जाधव, नवनाथ हारदे, विजय जाधव, भारत फलके, गणेश कापसे, अक्षय पवार, माजी सभापती रामदास भोर, राजेंद्र गुंजाळ, ऋषीकेश जाधव, सागर कापसे, विजय जाधव, शेखर उधार, सुरज सर, मारुती काळे, अर्जुन काळे, सचिन ठोकळ, अतुल फलके, हनुमंत सात्रळ, सदानंद जावक आदींसह युवकांनी सहभाग नोंदवून रक्तदान केले.
गावातील जीव देऊन नव्हे; तर रक्तदान करून आरक्षणाची मागणी केली असल्याचे डोंगरे यांनी सांगितले. या वेळी अजय ठाणगे, तुकाराम फलके, बाबासाहेब जाधव, संजय फलके, संदीप निमसे, तुकाराम कापसे, अरुण कापसे, विजय गायकवाड, दिगंबर जाधव, डॉ. विजय जाधव, रामदास जाधव उपस्थित होते. या रक्तदान शिबिरासाठी जनकल्याण रक्तपिढीचे डॉ. गुलशन गुप्ता व त्यांच्या सहकाऱ्यांनी मदत केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.