Maratha Reservation : आमदार अण्णा बनसोडे, खासदार श्रीरंग बारणेंनी दाखवली मोठा निर्णय घेण्याची तयारी

Pimpri Chinchwad News : आरक्षण दिल्यानंतर पुन्हा कोणीतरी न्यायालयात जाणार असल्याने तेथे ते टिकेल, असे आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
Srirang Barne-Anna Bansode-uma khapre
Srirang Barne-Anna Bansode-uma khapre Sarkarnama
Published on
Updated on

Pimpri News : मराठा आरक्षणासाठी समाजाच्या आमदारांनाही मंत्रालयात आंदोलन सुरू करावे लागले. त्यात मावळचे आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार गट) आमदार सुनील शेळके यांचा रुद्रावतार सर्व महाराष्ट्राने पाहिला. त्यानंतर अजित पवार गटाचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनीही आमदार शेळकेंप्रमाणेच पवित्रा घेतला. मराठा आरक्षणासाठी प्रसंगी राजीनामा देण्याची तयारी त्यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना दाखवली, अशी भूमिका घेणारे ते पिंपरी-चिंचवडमधील पहिलेच आमदार आहेत. पण, खरंच ते राजीनामा देणार का?, याकडेे पिंपरीकरांचे लक्ष लागले आहे. (Maratha reservation : MP Srirang Barne, MLA Anna Bansode ready to resign for Maratha reservation)

मंत्रालयातील आमदारांच्या आंदोलनात भाजपचे महेश लांडगे (भोसरी), अश्विनी जगताप (चिंचवड), अण्णा बनसोडे (पिंपरी) आणि उमा खापरे (विधान परिषद) यापैकी कुणीही सामील झाले नव्हते, त्यामुळे शहरातील आमदारांनी २४ तासांत आपली भूमिका जाहीर करावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने पत्रक काढून केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Srirang Barne-Anna Bansode-uma khapre
Maratha Reservation : सोलापुरात मराठा आंदोलकाची प्रकृती खालावली

गेल्या अनेक दिवसांपासून मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात राज्यभर आंदोलने करत असून, शहरातही अनेक ठिकाणी ते सुरू आहे. शहरातील आमदार लांडगे, बनसोडे, जगताप, खापरे तसेच खासदार श्रीरंग बारणे यांनी त्याबाबत अद्याप भूमिका स्पष्ट न केल्याने मोर्चाने नाराजी व्यक्त केली. तसेच, ती २४ तासांत जाहीर न केल्यास झोपेतील या आमदार, खासदारांना जागे करण्यासाठी मराठा समाज तुमच्या भेटीला येईल, असा इशाराही दिला.

मराठा मोर्चाच्या इशाऱ्यानंतर मावळचे आमदार शेळकेंनी आपण पहिल्या दिवशी मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा दिला असल्याकडे लक्ष वेधले. आरक्षणासाठी मराठा समाजाबरोबर होतो आणि ते मिळेपर्यंत शेवटपर्यंत राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. अशीच भूमिका पिंपरीचे आमदार बनसोडेंनीही मांडली. पहिल्या दिवसापासून मराठा आरक्षणाला माझा पाठिंबा असून, सरकारही ते देणार आहे. पण, ते कायद्याच्या कसोटीवर टिकणारे द्यावे लागणार असल्याने त्यासाठी वेळ लागत आहे, असेही ते म्हणाले. सर्वपक्षीयांच्या बुधवारच्या बैठकीतही हीच भूमिका दिसली, याकडे त्यांनी लक्ष वेधले. वेळप्रसंगी मराठा आरक्षणासाठी आपलीही राजीनाम्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.

Srirang Barne-Anna Bansode-uma khapre
Belgaum Black Day : मुख्यमंत्र्यांच्या मोठं बोलण्याला ठाकरे बाणा पडला भारी...

मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याची भूमिका अगोदरच जाहीर केली आहे, त्यासाठी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर बैठक झाल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले. तसेच, ते देण्याची प्रक्रियाही राज्य सरकारने सुरू केली असून, ते टिकाऊ देण्यासाठी वेळ लागत आहे. आरक्षण दिल्यानंतर पुन्हा कोणीतरी न्यायालयात जाणार असल्याने तेथे ते टिकेल, असे आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री हे स्वतः मराठा असून, मराठा आरक्षणासाठी त्यांनी शिवरायांची शपथ घेतल्याने ते देतील, असा विश्वास आहे, असेही ते म्हणाले. आरक्षण हे सरकार देणार असल्याने राजीनामा देऊन हा प्रश्न सुटणार नाही, तरी तशी कुणाची मागणी असेल, तर तोही देऊ, अशी तयारी खासदार बारणेंनी दाखवली.

राज्य सरकार मराठा आरक्षण देणारच आहे. पूर्वीही देवेंद्र फडणवीस सरकारने ते दिले होते. पण, उद्धव ठाकरे सरकारला ते टिकवता आले नाही, असे खापर आमदार खापरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर फोडले. आमदार लांडगेंचा संपर्क झाला नाही. पण, आमदार लांडगेंचा मराठा आरक्षणाला शंभर टक्के पाठिंबा असून, यापूर्वी पिंपरी चौकात झालेल्या मराठा आरक्षण मागणीच्या साखळी उपोषणाला त्यांनी भेट दिली होती, असे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले.

Srirang Barne-Anna Bansode-uma khapre
Maratha Reservation Protest : ...तर सरकारविरोधात 'काळी दिवाळी' साजरी करू; मराठा आंदोलकांचा इशारा!

मराठा आरक्षण ही काळाची गरज असल्याचे आमदार जगताप म्हणाल्या. मराठा समाजाची आर्थिक आणि सामाजिक स्थिती पाहता आरक्षण हे त्यांना मिळायलाच हवे. त्यासाठी सरकारचेही प्रयत्न चालले असून, फक्त ते टिकाऊ मिळावे; म्हणून त्याला वेळ लागत आहे, असे आमदार खापरे म्हणाल्या.

Srirang Barne-Anna Bansode-uma khapre
Kolhapur Politics News : शिंदे गटाच्या आमदार-खासदारांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी; विशेष अधिवेशन बोलावून...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com