Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal News: भुजबळांच्या अडचणी वाढणार; जामीन रद्द करण्यासाठी...

सरकारनामा ब्यूरो

Maratha community on Chhagan Bhujbal: ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण नको, यावर ठाम असलेले छगन भुजबळ मराठा समाजाच्या रडारवर आहे. "प्रकृतीच्या कारणास्तव जामिनावर असलेले छगन भुजबळ धडधाकट दिसतात. ते रोज समाजात विद्वेष पसरविण्याचे काम करतात. त्यामुळे त्यांचा जामीन का रद्द केला जात नाही, असा प्रश्न सकल मराठा समाजाने केला आहे. त्यामुळे भुजबळ यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नगर येथे झालेल्या ओबीसी एल्गार मेळाव्यात मराठा आरक्षणाच्या विषयावर राज्य सरकार आणि मराठा समाजावर अतिशय टोकदार टीका केली होती. यावेळी त्यांनी भाषणातून नाभिक समाजाला चितावणी देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे समाजात तेढ निर्माण झाल्याचा दावा त्यांचे विरोधक करीत आहेत. त्याच्या तीव्र प्रतिक्रिया राज्यभर उमटत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भुजबळ यांनी यासंदर्भात खुलासा करताना आपल्या भाषणाचा विपर्यास केला जात असल्याचे म्हटले आहे. मात्र भुजबळ यांनी नगर येथे नाभिक समाजाला केलेल्या आवाहनामुळे मराठा समाजाबरोबरच नाभिक समाजाच्या प्रतिनिधींनीही याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे नगर येथील भुजबळ यांची सभा नव्या राजकीय वादाला खतपाणी घालणारी ठरण्याची शक्यता दिसत आहे.

येथील सकल मराठा समाजातर्फे यासंदर्भात भुजबळ यांचा निषेध करण्यात आला. समाजाच्या शिष्टमंडळाने पोलिसांना निवेदन देऊन समाजामध्ये द्वेष पसरविणे आणि अशांतता निर्माण करण्यासाठी चिथावणी देणे, यासाठी भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करावा, त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना समज देण्यात यावी, अशी मागणी केली.

यासंदर्भात सकल मराठा समाजाचे समन्वयक व निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत बनकर, करण गायकर, नानासाहेब बच्छाव, योगेश नाटकर, अनिल आहेर, भाऊसाहेब निकम, विजय देवरे यांसह विविध पदाधिकाऱ्यांनी पंचवटी पोलीस ठाण्याच्या निरीक्षक मधुकर कड यांना लिखित निवेदन दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT