Shahapur News: मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात आंबेडकर स्मारकासाठी ३० वर्षांपासून संघर्ष; 'रमाबाई ब्रिगेड' आक्रमक

Ramabai Brigade Women's Association: मुख्यमंत्री भेट देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार...
Ramabai Brigade Women's Association news
Ramabai Brigade Women's Association newsSarkarnama
Published on
Updated on

Shahapur: डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकसाठी शहापुरात गेल्या ३० वर्षांपासून आंबेडकर अनुयायी सरकारकडे पत्रव्यवहार करून लोकशाही मार्गाने विविध आंदोलन करीत आहेत. पण सरकार याकडे दुर्लक्ष केले आहे. सरकारच्या निषेधार्थ रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या अध्यक्षा ज्योतीताई गायकवाड यांनी कुटुंबासह घर छोडो आंदोलन तहसील कार्यालयाच्या आवारात सुरू केले आहे. आंदोलनाच्या स्थळी त्यांनी संसार उपयोगी वस्तूसह चूलही मांडली आहे.

आंदोलनकर्त्या ज्योतीताई गायकवाड या शिवसेना (शिंदे गट) मागासवर्गीय विभागाच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या आंदोलनाला किती गांभीर्याने घेतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तर दुसरीकडे जोपर्यत मुख्यमंत्री आंदोलनस्थळी येत नाही. तो पर्यत रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या वतीने ‘घर छोडो’ आंदोलन सुरूच राहणार असल्याने आंबेडकरी जनता डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.

Ramabai Brigade Women's Association news
Devendra Fadanvis: पक्षाचे वॉर्ड अध्यक्ष ते मुख्यमंत्री; महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य...

शहापूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबडेकर चौकात बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यास सरकारकडे तब्बल ३० वर्षे पत्र व्यवहार करून विविध मार्गाने आंदोलन करण्यात येत आहे. मात्र सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारण्यास परवानगी का देत नाही हा प्रश्न संपूर्ण आंबडेकरी जनेतला पडला आहे. रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेकडून आजपासून घर छोडो आंदोलन करीत डॉ. आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.

शहापूर न्यायालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एका दाव्यासाठी आले होते. त्यामुळे त्यांच्या पदपर्शाने पुण्य झालेल्या शहापूर शहरात त्यांची आठवण म्हणून स्मारक करण्याची मागणी गेल्या ३० वर्षापासून मागणी होत आहे. दुसरीकडे शहापूर तालुका जिल्ह्यातील सर्वात मोठा आदिवासी तालुका म्हणून सरकार दरबारी नोंद आहे.

घर छोडो आंदोलनाची सुरवात आंबेडकर चौकातून सुरु झाली. तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मार्च २०२३ मध्ये शहापूर नगरपंचायत मुख्याध्याकाऱ्यांनी विश्रामगृहाच्या आवारात डॉ. आंबेडकरांचे स्मारक उभारण्यास ठराव मंजूर करून तो लेखी प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभाग शहापूर आणि तहसीलदार यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. मात्र अद्यापही त्यावर निर्णय घेतला नसल्यानेच आम्हाला अखेर घर दार सोडून हे आंदोलन करण्याची वेळ आल्याची गायकवाड कुटूंबाकडून सांगण्यात आले.

आजपासून सुरु झालेल्या घर छोडो आंदोलनाच्या ठिकाणी डीवायएसपी मिलिंद शिंदे , सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता बळवंत कांबळे, नगरपंचायतचे मुख्य अधिकारी, गायकवाड यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन चर्चा केली. मात्र ठोस आश्वासन दिले नसल्याने ज्योतीताई गायकवाड यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com