Malegaon News: मालेगाव शहरात बांगलादेशी नागरिकांचे प्रश्नावरून राजकीय वातावरण तापले आहे. या संदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मालेगावला दोन वेळा दौरा केला. या दौऱ्याचे राजकीय फलीत म्हणजे, मालेगावचे नेते एकमेकांवरच चिखलफेक करू लागले आहेत.
मालेगाव शहरात बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना बनावट जन्म दाखले देण्यात आल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. याबाबत त्यांनी प्रशासनाला दोन वेळा यादी देखील सादर केली होती. त्यावरून मालेगावचे प्रशासन सक्रिय होऊन जोरदार चौकशी सुरू झाली आहे.
या संदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या आणि मालेगाव येथील मायनॉरिटी डिफेन्स कमिटीच्या नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक आरोप झाले होती. या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी एकमेकांविरुद्ध आंदोलन देखील केले होते. याबाबत सातत्याने हा प्रश्न चर्चेत ठेवण्याचा प्रयत्न या निमित्ताने झाला.
शहराचे आमदार मौलाना मुफ्ती यांनी यासंदर्भात गंभीर आरोप करून या प्रकरणाला एक वेगळेच वळण दिले. आमदार मुफ्ती यांनी मालेगाव शहरात आंदोलन करणारे माजी आमदार आसिफ शेख आणि समाजवादी पक्षाचे मुष्ताक डिग्निटी व त्यांच्या सहकाऱ्यांवर गंभीर आरोप केला आहे. या नेत्यांनी मुंबईत सत्ताधारी नेत्यांची गुप्त बैठक केली होती, असे ते म्हणाले.
मुंबईत झालेल्या बैठकीनुसारच हे आंदोलन झाले. या आंदोलनासाठी समाजवादी पक्षाने काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना २५ हजार रुपयांची आर्थिक मदत देखील केली होती. त्यामुळे या संदर्भात सुरू असलेले आंदोलन हे दिखाऊ स्वरूपाचे आहे, असा आरोप आमदार मुफ्ती यांनी केला.
त्यांच्या या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे. त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. या संदर्भात समाजवादी पक्षाचे नेते डिग्निटी यांनी आमदार मुफ्ती यांना आव्हान दिले आहे. येत्या आठ दिवसात आमदार मुफ्ती यांनी याबाबत पुरावे सादर करावेत. अन्यथा त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
बनावट जन्म दाखल्यांच्या प्रश्नावर मालेगावचे नागरिक आणि महिला पोलिसांच्या चौकशीने त्रस्त झाले आहेत. त्यांना दिलासा देण्याची गरज आहे. यासंदर्भात आमदार मुफ्ती पूर्णतः अपयशी ठरले आहेत.
आमदार मुफ्ती आपले अपयश झाकण्यासाठी खोटे आरोप करीत आहेत. खरे तर आमदारांना कसलेही ज्ञान नाही. जनतेच्या प्रश्नावर ते निष्क्रिय आहेत. ते फक्त कमिशनबाजी आणि तोडपाणी करण्यातच व्यस्त आहेत, असे प्रत्युत्तर समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष डिग्निटी यांनी दिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.