Devendra Fadanvis & Maulana Mufti Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maulana Mufti Politics: आमदार मौलाना मुफ्ती यांचा भाजपला थेट इशारा... मुस्लिमांना टार्गेट करू नका!

Maulana Mufti; Don't target Muslims, follow the religion of the state, says Maulana Mukti-मालेगाव शहरात रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर आमदार मौलाना मुफ्ती यांनी दिल्या रमजान ईदच्या शुभेच्छा.

Sampat Devgire

AIMIM Maulana Mufti News: केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून मुस्लिम समाजाला टार्गेट केले जाते. विविध माध्यमातून असाच प्रचार सुरू असलेला दिसतो. त्याचे पडसाद देखील उमटले आहेत. त्यामुळे समाजात त्याचा नकारात्मक संदेश जात आहे.

मालेगाव शहरात रमजान ईद उत्साहात साजरी झाली. यावेळी सामुदायिक नमाज पठण करण्यात आले. या कार्यक्रमाला विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. 'एमआयएम'चे आमदार आणि मालेगाव शहरातील जामा मशिदीचे पेश इमाम मौलाना मुफ्ती यांनी यावेळी राजकीय संदेश दिला.

आमदार मौलाना मुफ्ती यांनी भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्षपणे चिमटा घेतला आहे. ते म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मुस्लिम समाजाचाही मोठा सहभाग होता. या देशाच्या जडणघडणीत मुस्लिमांचे देखील योगदान आहे. मात्र सध्या राजकीय दृष्टिकोनातून त्याची उपेक्षा केली जात आहे. त्यामुळे समाजात वेगळ्या संदेश जातो.

राज्यकर्ते कुठल्याही जाती, धर्माचे नसतात. ते संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करतात. देशात सध्या मात्र मुस्लिम बांधवांबद्दल द्वेष भावना पसरविण्याचे काम सुरू आहे. केंद्र आणि राज्य सरकारने यासंदर्भात आपला राजधर्म पाळला पाहिजे. तरच त्यांना सत्तेत राहता येईल, असे ते म्हणाले.

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी गेले काही दिवस मालेगाव शहरातील मुस्लिम समाजावर टीका केली होती. त्यांनी विविध दौरे करून बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिम येथे वास्तव्य करतात, असा आरोप केला होता. जन्म दाखले तपासणीसाठी मुख्यमंत्र्यांमार्फत एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर शहरातील चार हजारांना अधिक नागरिकांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. या सर्वांना विशेष तपास पथकाने कागदपत्रांसह तपासणीसाठी बोलविले होते. सुमारे तीन हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली होती. या संदर्भात आतापर्यंत बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्म दाखला मिळविल्याने १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र यामध्ये एकही बांगलादेशी नागरिक आढळलेला नाही.

बांगलादेशी नागरिक आणि बनावट जन्म दाखले या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून सातत्याने मालेगाव शहराला टार्गेट करण्यात आले आहे. यामध्ये राजकीय हेतू आहे हे लपून राहिलेले नाही. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात दारुण पराभव झाल्याने भाजपने ही भूमिका घेतली असावी. त्याचा खरपूस समाचार आमदार मौलाना मुक्ती यांनी घेतला आहे.

-------

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT