Ladki Bahin Yojana latest update Meghana Bordikar: विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना महायुतीला यश मिळवून देणारी ठरली. नंतर मात्र या योजनेवर सातत्याने टीका आणि चर्चा होत आहे. आता पुन्हा एकदा ही योजना राजकीय विषय ठरण्याची चिन्हे आहेत.
बनावट कागदपत्रांद्वारे आपली ओळख लपवून पुरुषांनी देखीलया योजनेचा लाभ घेतल्याचे पुढे आले होते. या पुरुषांवर कारवाई करत वसुली करण्यात येणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, त्यांच्यावर कारवाई नको, असे देखील काही जण बोलत होते. अखेर मंत्री मेघना बोर्डीकर यांनी यावर भूमिका स्पष्ट केली आहे.
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी लाडकी बहीण योजनेचे अनुदान घेण्यासाठी महिला झालेल्या पुरुषांवर वक्रदृष्टी केली आहे. योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांकडून वसुली करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
या वसुलीतून येणाऱ्या निधीचा विनियोग मुलांच्या शिक्षणासाठी आणि महिलांच्या विकासासाठी वापरण्यात येईल, या संदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. वसुलीसाठी शासकीय स्तरावर गांभीर्याने विचार सुरू असल्याचेही संकेत त्यांनी दिले.
नाशिकच्या दौऱ्यावर असलेल्या राज्यमंत्री बोर्डीकर यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. आगामी काळात भाजपला अधिक सक्रिय करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. निवडणुका असो वा नसो भाजप हा संघटनात्मक स्तरावर सक्रिय राहणारा पक्ष आहे. त्या दृष्टीने आढावा घेण्यात आल्याचे बोर्डीकर यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.