Aditi Tatkare : 'लाडकी बहीण' योजनेतील १५०० रुपये केवळ खर्च करू नका; बचतीचीही सवय लावा : आदिती तटकरेंचा मोलाचा सल्ला

Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून 'लाडकी बहीण योजने'च्या लाभार्थ्यांना १,५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana latest update
Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana latest updateSarkarnama
Published on
Updated on

Ladki Bahin Yojana News : विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹१५०० ची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांनी या रकमेचा योग्य वापर करत बचतीलाही प्राधान्य द्यावे, असा सल्ला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिला.

वाशिम येथे नव्याने उभारण्यात आलेल्या महिला व बालकल्याण कार्यालयाच्या लोकार्पण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी मिळणाऱ्या मदतीतील काही रक्कम बचतीसाठी राखून ठेवण्याचे आवाहन केले.

तटकरे म्हणाल्या, "महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा झाल्यानंतर बाजारपेठेत खरेदी वाढते, ही आनंदाची बाब आहे. मात्र, संपूर्ण रक्कम खर्च करण्याऐवजी त्यातील ५०० ते १००० रुपये बचत गट, बँक किंवा पतसंस्थेत जमा करून बचतीची सवय लावली, तर भविष्यात त्याचा मोठा फायदा होईल."

Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana latest update
Aditi Tatkare: राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणास सुनेत्रा पवार यांचा विरोध नाही?, आदिती तटकरेंच्या विधानाने होऊ शकतो नवा वाद?

यावेळी मंत्री तटकरे यांनी एक अनुभवही सांगितला. "व्यापारीदेखील विचारतात की, लाडक्या बहिणींचे पैसे कधी जमा होणार? कारण पैसे जमा झाल्यानंतर बाजारपेठेत मोठी उलाढाल वाढते," असे त्या म्हणाल्या.

Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana latest update
Aditi Tatkare : सरकारच्या ऑपरेशन 'वसुली'ने 12 हजारांहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले; 165 कोटी पैसे वसुलण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

महिलांनी केवळ तात्पुरत्या गरजांसाठीच नव्हे, तर भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेचाही विचार करून या योजनेतील रकमेचा नियोजनबद्ध वापर करावा, असा संदेश आदिती तटकरे यांनी यावेळी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com