MHADA Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

MHADA Scam Nashik : नाशिकची बिल्डर लॉबी हादरली : म्हाडा घोटाळ्यातील बड्या व्यावसायिकाला बेड्या; कारवाईच्या भीतीने काहीजण पसार

Sonu Manwani arrest MHADA Scam Nashik : नाशिकमध्ये झालेल्या कथित म्हाडा घोटाळा प्रकरणात नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बड्या व्यावसायिकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्याने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.

Ganesh Sonawane

Nashik News : नाशिकमधील कथित म्हाडा घोटाळ्याची सध्या जोरदार चर्चा आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष्य लागून असलेल्या म्हाडा जमीन फसवणूक प्रकरणात आता पोलिसांनी पहिली मोठी कारवाई केली आहे. एका बड्या बांधकाम व्यावसायिकाला पोलसांनी बेड्या ठोकल्याने नाशिकची बिल्डर लॉबी हादरली आहे.

हॅप्पी होम डेव्हलपर्सचा संचालक दिनेश कन्हैयालाल ऊर्फ सोनू मनवाणी याला सोमवारी (दि. १६) नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांनी अटक केली. संशयित मनवाणी यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या कारवाईने बड्या बिल्डरांचे धाबे दणाणले असून अनेक बांधकाम व्यावसायिक पसार झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, मनवाणीला तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.

महापालिका क्षेत्रातील ४९ गृहप्रकल्पांमध्ये म्हाडा सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी २० टक्के राखीव क्षेत्र ठेवण्याचा नियम धाब्यावर बसवून म्हाडा, महसूल आणि भूमी अभिलेख विभागाची फसवणूक केल्या प्रकरणी १९४ विकासकांवर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये अनेक नामवंत विकासकांचा समावेश असल्याने पोलिसांच्या पुढील कारवाईकडे लक्ष लागून आहे.

पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरु केला असून रविवारी (दि. १५) रात्री उशिरापर्यंत सात ते आठ जणांची चौकशी केली. त्यानंतर सरकारवाडा पोलिसांच्या पथकाने सोमवारी पहाटे मनवाणी यांना अटक केली. मनवाणी व त्याचा भाऊ विनोद मनवाणी हे 'हॅप्पी होम डेव्हलपर्स'चे संचालक असून, या प्रकल्पातील इतर भागीदारांवरही अटकेची टांगती तलवार आहे.

या प्रकरणात एकुण ४९ प्रकल्पांचा तपास सुरू आहे. मूळ १०४ जमीन मालकांसह ९३ असे एकूण २९५ विकासक, बांधकाम व्यावसायिक व सध्याचे मालक तपासाच्या कक्षेत आले आहेत. या घोटाळ्यातील संशयितांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेची विशेष पथके कामाला लागली आहेत. दरम्यान सोनू मनवाणी यास अटक केल्याने विकासकांमध्ये मोठ्या प्रमाणात घबराट निर्माण झाली असून अनेक विकासक नॉट रिचेबल असल्याची चर्चा आहे.

दरम्यान सोमवारी रात्री गुन्हे शाखेच्या पथकांनी आणखी काही बांधकाम व्यावसायिकांच्या घरावर छापेमारी केली. यात आठ ते दहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT