Chhagan Bhujbal News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal Politics : राजापूर पाणी योजनेचा भुजबळ घेतात रोज आढावा...'हे' आहे कारण!

Sampat Devgire

Chhagan Bhujbal News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध नेते निवडणुकीची तयारी करीत आहेत. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे देखील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बाह्या सरसावून कामाला लागले आहेत.

नुकत्याच झालेल्या लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीत उमेदवारीची संधी न मिळाल्याने अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ नाराज होते. मात्र ही नाराजी बाजूला ठेवून त्यांनी आता येवला विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी ते गेल्या सहा महिन्यांपासून आपले समर्थक आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद करीत आहेत. विशेषत: मतदार संघातील प्रमुख नेत्यांची मोट बांधण्यासाठी सध्या ते कार्यमग्न आहेत.

भुजबळ यांनी येवला मतदार संघातील पाण्याच्या प्रश्नावर यंदा भर दिला आहे. यामध्ये मांजर पाडा दरसवाडी-डोंगरगाव कालवा प्रमुख आहे. सध्या राजापूर सह 40 गावांना पाणीपुरवठा करण्याचे योजना अंतिम टप्प्यात आहे. या योजनेसाठी नांदूर मधमेश्वर धरणात जॅकवेल उभारण्याचे काम सुरू आहे. निवडणुकीपूर्वी ते काम पूर्ण करण्यासाठी मंत्री भुजबळ यांचे प्रयत्न आहेत. दोनशे कोटी रुपये खर्चाची ही योजना आहे. ती पूर्ण केल्यास मतदारसंघासाठी पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न सुटणार आहे.

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) स्वतः त्यात रोज लक्ष घालत आहेत. गुरुवारी त्यांचे पदाधिकारी दिलीप खैरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देऊन या कामाचा आढावा घेतला. हे काम पावसाळ्यात धरण भरण्याआधी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भुजबळ येवला मतदार संघातून 2004 मध्ये विजयी झाले होते.

या पहिल्या टर्ममध्ये पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेला वळविण्याची योजना आली. त्यात भुजबळ यांनी प्राधान्याने मांजरपाडा हा प्रकल्प समाविष्ट केला. 2009 मध्ये नाशिक येथे मंत्रिमंडळाच्या बैठकीत या वळण योजनांना मंजुरी मिळाली. 2017 मध्ये नऊ किलोमीटर लांबीचा कालवा बांधण्याचे काम सुरू झाले.

सध्या त्याचे अस्तरीकरण सुरू आहे.अस्तरी करण्याच्या कामासाठी 275 कोटींचा निधी खर्च होणार आहे. पाण्याशी संबंधित या दोन्ही योजनांमुळे आगामी निवडणुकीत भुजबळ यांना मतदारसंघात अधिक चांगला पाठिंबा मिळेल, असा दावा त्यांचे समर्थक करतात. विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने भुजबळ यांनी मतदार संघातील निवडणुकीची बांधणी सुरू केली आहे.

त्यांचे समर्थक नियमितपणे मतदारसंघात लक्ष घालत आहे. स्वतः भुजबळ यांचे देखील या भागात दौरे वाढले आहेत. त्यामुळे पाण्याच्या प्रश्नाला प्राधान्य देत मंत्रिमंडळ यांनी येवला विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीची जोरदार तयारी त्यांनी केली असल्याची चर्चा मतदारसंघात सुरु आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT