Maratha Kranti Morcha Agitation News Updates
Maratha Kranti Morcha Agitation News Updates Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

अशोक चव्हाणांमुळे मराठा समाजात नैराश्य आले

Sampat Devgire

नाशिक : मराठा (Maratha reservation) समाजाला आरक्षण मिळावे यासाठी युवकांनी गेली काही वर्षे सातत्याने आंदोलन केले आहे. मराठा क्रांती मोर्चातर्फे (Maratha kranti Morcha) याबाबत पाठपुरावा केला जात आहे. मात्र या खात्याची जबाबदारी असलेले मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) निष्क्रीय आहेत. ते या विषयावर काहीच करीत नसल्याने समाजात नैराश्य पसरले आहे, असा आरोप मराठी क्रांती मोर्चातर्फे करण्य़ात आला आहे. (Maratha Kranti Morcha Agitation News Updates)

मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या बंगल्यासमोर आंदोलन करणाऱ्या मराठा समन्वयकांना पोलिसांनी मुंबईत अटक केली. श्री. चव्हाण यांच्या बंगल्यासमोर आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केल्याच्या निषेधार्थ बुधवारी मुंबई येथे मराठा क्रांती मोर्चातर्फे त्यांच्या निवासस्थानासमोर या कृतीचा जाहीर निषेध करण्यात आला.

यासंदर्भात निवेदन प्रसिद्धीस देण्यात आला आहे. निवेदनाचा आशय पुढीलप्रमाणे, अशोक चव्हाण यांच्यामुळे मराठा समाजात नैराश्य तयार झालेले आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाची व्याप्ती महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हानिहाय वसतिगृह प्रश्न तारादूत एमपीएससी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची जॉइनिंग मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबीयांच्या नोकरीचा प्रश्न यापैकी एकही प्रश्न अशोक चव्हाणांना सोडवता आलेला नाही. त्यामुळे आज मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळ त्यांना निवेदन देण्यासाठी गेले असता त्यांनी गेटच्या बाहेर बसवून अपमान केलेला आहे.

अशोक चव्हाण हे मराठा आरक्षणाचा घात करत आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला नाही तर जनआंदोलन उभे राहील. याप्रसंगी करण गायकर, राजेंद्र कोंढरे, धनंजय जाधव, अंकुश कदम, चित्रे पाटील, अप्पासाहेब कुडेकर, महादेव देवसरकर, गंगाधर काळकुटे, प्रमोद जाधव, नवनाथ शिंदे, गणेश वाकचौरे, वैभव दळवी, प्रशांत शिरोळे, रोशन पवार, दुर्गेश कामठेकर, महादेव कदम, अशोक काळकुटे, स्वप्नील घरत, अभिजित मोकळ, जितेंद्र ठाकूर, प्राजक्ता फले, अंकुश बागमारे, आनंद कोडीलकर, राजेश मोकळ, दिनेश खडतरे आदी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT