उत्तर महाराष्ट्रात शिवसेनाच किंग; भाजपला सेनेशी पंगा महागात पडला!

उत्तर महाराष्ट्रात नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचा प्रभाव दिसला.
Nagarpanchayat Election: Shivsena wins highest seats in North Maharashtra
Nagarpanchayat Election: Shivsena wins highest seats in North MaharashtraSarkarnama

नाशिक : नगरपंचायतीच्या निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात अखेर शिवसेनाच (Shivsena) किंग आणि किंगमेकर ठरली आहे. भाजपला (BJP) शिवसेनेशी युती तोडल्याचा फटका बसल्याचे स्पष्ट झाले. हे निकाल राष्ट्रवादी (NCP)काँग्रेसला (Congress) सुधारण्याचा इशारा देऊन गेले आहेत. विशेषतः केवळ नऊ जागा व चार ठिकाणी खातेही न उघडलेल्या काँग्रेसला आत्मपरिक्षण करण्याची संदेश मतदारांनी दिला आहे. (Nagarpanchayat Election: Shivsena wins highest seats in North Maharashtra)

Nagarpanchayat Election: Shivsena wins highest seats in North Maharashtra
राष्ट्रवादीचे आमदार नितीन पवार यांनी कळवणला बाजी मारली

नाशिक, जळगाव व धुळे जिल्ह्यातील नऊ नगरपंचायतींच्या १५३ प्रभागांत निवडणुका झाल्या. त्यातील सर्वाधिक ५१ जागा शिवसेनेला मिळाल्यात. भाजप ४३, राष्ट्रवादी काँग्रेस ३५, काँग्रेस ९, मनसे १, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ६, बसपा १, आघाडी ४ व अन्य अपक्ष असे बलाबल आहे.

या निवडणुकीत आमदार चंद्रकांत पाटील (बोदवड), चंद्रकांत रघुवंशी (साक्री), अनिल कदम, रामदास चारोस्कर, भास्कर गावित हे नेते शिवसेनेसाठी जोमाने कामाला लागले होते. भाजपने देवळा व साक्रीत आपल्या विशिष्ट प्रभाव वापरला. त्या तुलनेत राष्ट्रवादीचे नेते एकटे लढत असल्याचे दिसले. काँग्रेसचे नेते बातम्या ऐकण्या पलिकडे काहीच करीत नव्हते. त्यामुळे दोन्ही काँग्रेसला आपली कार्यशैली बदलावी लागेल. संघटीत शक्ती व नियोजन न केल्यासे त्याचा फटका दोन्ही काँग्रेसला बसेल हे निसंशय. भाजप-शिवसेनेची युती संपुष्टात आल्यानंतर झालेली ही निवडणूक होती. त्यात भाजपला शिवसेनेशी घेतलेला पंगा महागात पडल्याचे ग्राऊंडवर स्पष्टपणे जाणवले.

Nagarpanchayat Election: Shivsena wins highest seats in North Maharashtra
बोदवडकरांचा एकनाथ खडसे नव्हे तर चंद्रकांत पाटलांवर विश्वास

उत्तर महाराष्ट्रात एकुण राजकीय पोत विचारात घेता यापुढे भाजपने कितीही गाजावाजा व गोंधळ केला तरी महाविकास आघाडीपुढे ते फेल ठरणार हे या निकालांतून दिसते. कारण महाविकास आघाडीकडे १०५ जागा व बोदवड, धडगाव, पेठ, कळवण, निफाड, दिंडोरी सहा नगरपंचायतीत सत्ता आली. भाजप त्यापुढे तीन नगरपंचायत व ४३ जागांवर आहे. यात देवळा व साक्री वगळता सुरगाण्यात भाजपच सत्तेत येईल याचे भाकीत आजच करता येणार नाही.

नाशिक जिल्ह्यात महाविकास आघाडीची सरशी झाली आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील ठरलेल्या सुरगाणा आणि दिंडोरीमध्ये त्रिशंकू स्थिती तयार झाली आहे. शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ शेलार, अनिल कुंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-शहर विकास आघाडीने निफाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप बनकर यांच्या गटाला धोबीपछाड दिली. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार आणि त्यांचे थोरले दीर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नितीन पवार यांच्या प्रतिष्ठेच्या लढतीत दिराने बाजी मारत महाविकास आघाडीला सत्ता मिळवून दिली. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी देवळ्यातील सत्ता आपल्याकडे राखली.

विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघातील पेठ नगरपंचायतीमध्ये श्री. झिरवाळ यांचा मुलगा गोकुळ झिरवाळ यांनी नेतृत्व करत राष्ट्रवादीला १७ पैकी आठ जागा मिळवून दिल्या. पेठमधील सत्तेचे किंगमेकर जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे सदस्य भास्कर गावित यांना चार जागांवर समाधान मानावे लागले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला तीन, अपक्ष आणि भारतीय जनता पक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेठमध्ये पाच उमेदवारांपैकी एकालाही खाते उघडता आले नाही. अपक्षांच्या साथीने राष्ट्रवादी काँग्रेस पेठमध्ये सत्ता मिळविण्याची शक्यता अधिक आहे.

दिंडोरीमध्ये शिवसेनेला सर्वाधिक सहा, राष्ट्रवादीला पाच, भारतीय जनता पक्षाला चार, काँग्रेसला दोन जागांवर यश मिळाले. माजी आमदार रामदास चारोस्कर शिवसेनेची सूत्रे सांभाळत आहेत. त्यांना मानणाऱ्यांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसमध्ये सदस्य आहेत. त्यामुळे त्यांच्या मदतीने शिवसेना सत्ता आपल्याकडे राखणार की महाविकास आघाडीच्या राजकारणात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेणार याबद्दलचे प्रश्‍नचिन्ह कायम आहे.

कळवणमध्ये आमदार पवार आणि कौतिकराव पगार यांच्या राष्ट्रवादीला १७ पैकी नऊ, काँग्रेसला तीन जागांवर यश मिळाले. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या. मनसेनेही खाते उघडले.

जिल्हावासीयांचे निफाडच्या राजकीय समीकरणाकडे अधिक लक्ष असते. निफाडमध्ये १७ पैकी शिवसेना सात, शहरविकास आघाडी चार, काँग्रेसला एक, बहुजन समाजवादी पक्षाला एक आणि अपक्ष एक असे आघाडीच्या राजकारणाचे बलाबल १४ पर्यंत पोचले. राष्ट्रवादीला तीन जागांवर समाधान मानावे लागले. भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांनी सुरगाण्यात तळ ठोकला होता. १७ पैकी भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक आठ जागा मिळाल्या आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला दोन, राष्ट्रवादी काँग्रेसला एक, शिवसेनेला सहा जागा मिळाल्या आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार जे. पी. गावित यांची भूमिका सत्ता स्थापन करण्याच्या अनुषंगाने महत्त्वाची ठरणार असे दिसते. श्री. गावित यांनी शिवसेना, राष्ट्रवादीसमवेत आघाडी केल्यास भाजपला सत्तेपासून दूर राहण्याची शक्यता अधिक आहे. दरम्यान, देवळ्यात भारतीय जनता पक्षाला १५ जागांवर यश मिळाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागा मिळाल्या.

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com