Chhagan Bhujbal  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rajya Sabha Election 2024: मोठी बातमी ! छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार ? स्वत:च दिली 'ही' माहिती

Arvind Jadhav

Nashik News: राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी सध्या भाजपसह काँग्रेसकडून रणनीती आखली जात आहे. वेगवेगळ्या उमेदवारांची नावेही पुढे येत आहे. त्यात एक नाव मंत्री छगन भुजबळ यांचेही आहे. मात्र, राज्यसभेच्या निवडणुकीबाबत आपल्याला माहिती नाही. तसेच मी इच्छुक आहे, याची मला कल्पना नाही, असे मिश्किल उत्तर छगन भुजबळ यांनी दिले. (Chhagan Bhujbal On Rajya Sabha Election)

महाराष्ट्रातून राज्यसभेचे खासदार अनिल देसाई, प्रकाश जावडेकर, कुमार केतकर, व्ही.मुरलीधरण, नारायण राणे आणि वंदना चव्हाण यांचा कार्यकाळ 02 एप्रिल 2024 रोजी संपत असल्याने राज्यातून राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत आहेत. या जागांसह अन्य राज्यांतील राज्यसभेच्या एकूण 56 जागांसाठी 27 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भाजपचा वरचष्मा राहणार असल्याने राज्यसभेसाठी कोणाची वर्णी लागते, याबाबत तर्कवितर्क लढवण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपकडून पंकजा मुंडे यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, अमरीश पटेल आदींची नावे चर्चेंत आहेत. या नावांमध्ये अचानक मंत्री छगन भुजबळ यांच्याही नावाची चर्चा सुरु झाली. याबाबत आज पत्रकार परिषदेदरम्यान पत्रकारांनी भुजबळांना राज्यसभा निवडणुकीमध्ये आपण उमेदवारी करणार का, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर याची “मला कल्पना नाही”, एवढेच उत्तर भुजबळ यांनी दिले.

राज्यसभेसाठी आपण इच्छुक आहात का, असा प्रश्न विचारण्यात आला असता “त्याचीही मला कल्पना नाही”, असे मिश्किल उत्तर देत राज्यसभा निवडणुकीचा विषयच थांबवला. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर एकवेळी छगन भुजबळ विरूद्ध राज्य सरकार अशी स्थिती निर्माण झाली होती. ओबीसी आरक्षणापुढे पक्ष नाही, अशी जाहीर भूमिका भुजबळांनी घेतल्यानंतर मात्र त्यांना भाजपकडून रसद पुरविली जात असल्याची चर्चा सुरू झाली.

मागील काही दिवसांपासून होणाऱ्या घडामोडींचा विचार करता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असो की, भाजप यांच्यावरील टीकेला चोख प्रत्युत्तर देत त्यांची पाठराखण करण्याचे काम भुजबळांकडून सातत्याने होत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा एक्सवरपोस्ट टाकून भुजबळ भाजपमध्ये जातील आणि भाजप त्यांना ओबीसीचा चेहरा म्हणून पुढे करतील,असा दावा केला होता.

(Edited By-Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT