MNS News : राज ठाकरेंच्या निकटवर्तीयांविरोधात खंडणीचा गुन्हा...

CIDCO Police : सिडको पोलिसांत मनसे उपाध्यक्षांच्या विरोधात एक लाखाची मागणी केल्याची तक्रार.
MNS
MNSSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : नाशिक शहरात रोजगार मेळावा आयोजित करणाऱ्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर सिडको पोलिसांनी 1 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या निकटवर्तीयांविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याने खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष आदेश खांडरे, प्रतीक निकम, चेतन शेलार, अक्षय खांडरे यांच्या विरोधात सिडको पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

यासंदर्भात कंत्राटदार राजेंद्र गोरडे यांनी ही तक्रार केली आहे. पोलिस निरीक्षक दीपक ठाकूर यांनी संबंधितांची चौकशी करण्यात येत असून, लवकरच त्याबाबत पुढील कारवाई करण्यात येईल असे सांगितले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे नाशिक शहरात बेरोजगार युवकांसाठी येत्या 15 फेब्रुवारीला रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. या मेळाव्याच्या तयारीत आयोजक व्यस्त होते.

MNS
CM Eknath Shinde Birthday : 'काय झाडी...' नंतर शहाजीबापूंना आलेलं टेन्शन मुख्यमंत्री शिंदेंनी एका वाक्यात दूर केलं...

संबंधितांनी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 24 मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचे काम बंद पाडले. कंत्राटदाराला पुन्हा हे काम सुरू करावयाचे असेल, तर एक लाख रुपये द्यावे लागतील असे धमकावले. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराने पोलिसांशी संपर्क करून तक्रार केली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, हे सर्व कार्यकर्ते राज ठाकरे यांचे निकटवर्तीय असल्याचे बोलले जाते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारण तापलेले आहे. सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांचे इच्छुक निवडणुकीची तयारी करीत आहेत. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांना मंजूर झालेल्या निधीतून विविध कामे सुरू आहेत. या कामाविषयी अनेक तक्रारी आहेत. त्यातच हा प्रकार घडल्याने त्याला राजकीय वासदेखील आहे.

त्याचा फटका मनसेच्या पदाधिकाऱ्यांना तर बसला नाही ना ? असे बोलले जाते. दरम्यान, मनसेचे नाशिक संपर्कप्रमुख किशोर शिंदे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात दाखल केलेला गुन्हा राजकीय सूडबुद्धीतून झालेला आहे. स्थानिक राजकीय स्पर्धेतून मनसे पदाधिकाऱ्यांना नाउमेद करण्याचा हा प्रयत्न आहे. त्याचा आम्ही सामना करून सत्य बाहेर आणू, असे ते म्हणाले.

(Edited by Amol Sutar)

R

MNS
Abhishek Ghosalakar: अभिषेक घोसाळकरांचे प्लॅनिंग ठरलं होतं, पत्नी मुलांसह जाणार होते; पण...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com