Dada Bhuse & Aditya Thackrey
Dada Bhuse & Aditya Thackrey Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dada Bhuse News; मला आदित्य ठाकरे यांची कीव येते!

Sampat Devgire

नाशिक : (Nashik) गेल्या सहा महिन्यांपासून तीन शब्दांपलीकडे ते बोलत नाहीत. आता तर ग्रामपंचायत सदस्यांनाही आव्हान देत आहेत. माझे आजोबा (Balasaheb Thackrey) चोरले अशी टिका करीत आहेत. हे सर्व पाहिल्यावर मला आदित्य ठाकरे (Aditya Thackrey) यांची कीव येते, अशी टिका एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी श्री. ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यावर केली. (Dada Bhuse Criticise Shivsena Leader Aditya Thackrey`s Nashik visit)

शिवसेना नेते आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर असताना पालकमंत्री दादा भुसे यांनी त्यांचा समाचार घेतला. केवळ आडनाव ठाकरे असून चालत नाही, तर लोकांमध्ये सतत वावरावे लागते. आम्ही काही क्षणांसाठीच थोडे घराबाहेर पडतो, असा टोलाही त्यांनी आदित्य ठाकरेंना लगावला.

आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर सडकून टीका केली. त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आज आव्हान दिले. या पार्श्वभूमीवर वसंत व्याख्यानमालेच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पालकमंत्री भुसे म्हणाले, की आम्ही सातत्याने जनतेसोबत राहतो. सहा महिन्यांपासून त्यांना तीन शब्दांच्या पलीकडे बोलता येत नाही. सरकार अत्यंत चांगले काम करत आहे. त्यामुळे विरोधकांकडे बोलण्यासाठी काही मुद्देच राहिलेले नाहीत. त्यांनी शेतकरी, कष्टकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात बोलले पाहिजे.

आदित्य ठाकरे यांनी आजोबा चोरल्याचे म्हटले आहे, त्यावर भुसे म्हणाले, की हिंदुहदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे राष्ट्र्पुरुष आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या मनाचा कोतेपणा येथे दिसून येतो. उद्या हे छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांनाही चोरले, असे म्हणतील, हा त्यांच्या मनाचा कमीपणा आहे. केवळ आडनाव ठाकरे असून चालत नाही, लोकांमध्ये सातत्याने असले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT