Gulabrao Patil & Ravi Rana Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

अस्वस्थ गुलाबराव म्हणाले, `या रवी राणांना कोणी तरी आवर घाला`

पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे केली मागणी

Sampat Devgire

जळगाव : कालपर्यंत हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) आणि बेधडक विधाने करून भाजप (BJP) विरोधकांवर आगपाखड करणारे आमदार रवी राणा शिवसेना (Shivsena) विरोधकांना प्रिय होते. मात्र त्यांचे हे उपद्रवमुल्य आता शिंदे सरकारच्या (Eknath Shinde supporters) आमदारांनाच छळू लागल्याने सरकारमधील मंत्री अस्वस्थ (Ministers uneasy) झाले आहे. या रवी राणा (Ravi Rana) यांना आवर घाला अशी मागणी पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याकडे केली आहे.(Shinde Government supporters restless on Ravi rana`s Money arraignment on Bacchu Kadu)

शिंदे सरकारमधील अन्य काही मंत्री आणि समर्थक आमदार देखील राणा यांच्या आरोपांमुळे अस्वस्थ झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे हे प्रकरण कोय वळण घेते याची उत्सुकता आहे.

अमरावतीतील नेतृत्वाचा वाद असू शकतो. एका जिल्ह्यातील वादासाठी राज्यातील चाळीस आमदारांना बदनाम करण्याची गरज नाही. शिंदे गटातील कोणीही विकावू नाही. गुवाहाटीला कोणीही पैसे घेतले नाही. आमदार रवी राणा यांनी चाळीस आमदारांची बदनामी करू नये. केलेले विधान मागे घ्यावी, अशी मागणी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री, जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली.

गुवाहाटीला जाऊन पैसे घेतल्याचा आरोप आमदार राणा यांनी आमदार बच्चू कडूंवर केला होता. त्यावर पत्रकारांनी मंत्री पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, की अमरावती जिल्ह्यातील नेतृत्वाचा हा वाद असू शकतो. शिंदे गटातील कोणीही विकावू नाही. गुवाहाटीला जाऊन कोणीही पैसे घेतले नाही.

अमरावती जिल्ह्यातील नेतृत्वाच्या वादामुळे राज्याच्या ४० आमदारांची बदनामी करण्याची गरज नाही. एका व्यक्तीवर आरोप करणे म्हणजे सगळ्यांवर आरोप करणे, असा होतो. त्यामुळे रवी राणा यांनी आपला शब्द मागे घेतला पाहिजे. कोणी विकावू नाही या गोष्टीचा अभ्यासदेखील त्यांनी केला पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू यांची समज घातली पाहिजे आणि या विषयावर पडदा पाडला पाहिजे.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT