Gulabrao Patil News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Gulabrao Patil News : " नोकरी अन् छोकरी एवढंच स्वप्न होतं..."; मंत्री गुलाबराव पाटील मनातलं बोलले

Jalgaon Politics : " मला राजकारणाची आवडदेखील नव्हती, पण..."

Deepak Kulkarni

Jalgaon News : मंत्री आणि शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील कायमच त्यांच्या रोखठोक विधानांसाठी ओळखले जातात. महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेले पाटलांनी शिवसेनेतील दुफळीनंतर एकनाथ शिंदेंची साथ दिली. शिंदेंसोबत गेलेल्या अनेक नेतेमंडळींची पुन्हा मंत्रिपदी वर्णी लागली, पण त्यांची खाते बदलली गेली. शिंदे सरकारमध्ये एकमेव गुलाबरावांचं खातं कायम राहिलं. ते विरोधकांवर विशेष म्हणजे ठाकरे गटावर टीका करण्यातही आघाडीवर असतात, पण आता याच गुलाबराव पाटलांनी मोठे राजकीय गुपित उलगडताना एका गोष्टीची जाहीर कबुली दिली आहे.

जळगावमध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटलांनी(Gulabrao Patil) मोठं विधान केले आहे. आपल्या खास संवादफेकीनं राजकारणात भल्याभल्यांची दांडी गुल करणाऱ्या पाटलांनी आता राजकीय वाटचालीवर भाष्य केले आहे. त्यांनी आपण राजकारणात चुकून आलो असल्याचे सांगत नोकरी आणि छोकरी एवढंच आपलं स्वप्न होतं, अशी कबुली दिली आहे.

पाटील म्हणाले, नोकरी आणि छोकरी एवढंच माझं स्वप्न होते. मी राजकारणात चुकून आलो. मी राजकारणात यावे, असे माझे कधी स्वप्न नव्हते. मला राजकारणाची आवडदेखील नव्हती, पण कॉलेज जीवनात नाटकात काम करण्याची आवड होती. त्यातून चांगलं बोलण्याची कला शिकलो असल्याचेही त्यांनी सांगितले.

आमच्या गावात शिवसेनेची (Shivsena) शाखा स्थापन झाली होती. या शाखेत आपण यावे आणि आपण तरुणांना संबोधित करावे, असे अनेकांना वाटत होते. त्यातूनच राजकारणात प्रवेश झाला आणि कधी नव्हे ते बाळासाहेब ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यात बोलण्याची संधी मिळाली. त्यानंतर राजकारणात घट्ट पाय रोवत गेलो, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.

"...आणि 1999च्या निवडणुकीत आमदार झालो!"

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी(Balasaheb Thackeray) मला वयाच्या 26 व्या वर्षी 1996 मध्ये मला जिल्हाप्रमुख केले. त्यानंतर जिल्हा परिषद, सभापती आणि 1999च्या निवडणुकीत आमदार झालो, पण 1987 च्या सु्मारास काही लोकांसह शिवसेनेत दाखल झालो. तसेच गावात शाखाही सुरू केली. मात्र, एका आंदोलनात सहभागी झाल्यामुळे गुन्हा दाखल झाल्याची गमतीशीर किस्साही त्यांनी सांगितला. तसेच राजकीय वाटचालीत आपल्याला वक्तृत्व आणि नाटक कलेचा फायदा झाल्याचेही गुलाबराव पाटील म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT