NCP Crisis : राष्ट्रवादीची लढाई आता सर्वोच्च न्यायालयात; शरद पवारांनंतर अजितदादांचीही याचिका

Sharad Pawar VS Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात 'कॅव्हेट' दाखल करण्यात आली
Sharad Pawar and 
Ajit Pawar
Sharad Pawar and Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पक्ष आणि चिन्हाचा वाद थेट निवडणूक आयोगात गेला असून, यावर पहिली सुनावणी शुक्रवारी झाली. यानंतर सोमवारी पुन्हा निवडणूक आयोगात सुनावणी पार पडणार आहे. मात्र, आयोगातील सुनावणी आधीच शरद पवारांनी मोठी खेळी खेळत थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

यानंतर आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडूनही सर्वोच्च न्यायालयात 'कॅव्हेट' दाखल करण्यात आली आहे. तसेच आमचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे. यावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Sharad Pawar and 
Ajit Pawar
NCP Crisis : शरद पवारांची मोठी खेळी; निवडणूक आयोगातील सुनावणीआधीच उचललं मोठं पाऊल

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत अजित पवार यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांवर कारवाई करण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना द्याव्यात, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली. या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे, पण या आधीच अजित पवार गटानेही न्यायालयात धाव घेत 'कॅव्हेट' दाखल केल्यामुळे राष्ट्रवादीची कायदेशीर लढाई आता सर्वोच्च न्यायालयातही सुरू झाली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या पक्ष चिन्हाच्या वादावर शुक्रवारी निवडणूक आयोगात सुनावणी पार पडली. या सुनावणीत दोन्ही गटांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. या वेळी पक्षाध्यक्ष शरद पवार हे स्वतः उपस्थित होते. आता सोमवारी होणाऱ्या सुनावणीत काय फैसला होतो, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे, तर दुसरीकडे दोन्ही गटांकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सोमवारीच सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे या दोन्ही सुनावणीकडे राज्याचे लक्ष असणार आहे.

Edited by Ganesh Thombare

Sharad Pawar and 
Ajit Pawar
NCP Crisis : शरद पवार विरुद्ध अजितदादा; निवडणूक आयोगातील सुनावणी संपली; सोमवारी होणार फैसला ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com