धुळे : हद्दवाढीसह धुळे (Dhule) तालुक्यातील प्रमुख गावांतील विकास कामांसाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hussan Mushrif) यांनी एक कोटी रुपये मंजूर केले असल्याची माहिती शहराचे आमदार फारुक शाह (Farukh Shah) यांनी दिली. धुळे शहराची हद्दवाढ झाल्याने या गावांतील विकासकामे रखडली होती. त्यांना आता काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. (MLA farukh shah took follow up for funds to Dhule`s villages)
धुळे महापालिका हद्दवाढ क्षेत्रासह धुळे तालुक्यातील शहराजवळील सोनगीर, महिंदळे, न्याहळोद या गावांमध्ये कब्रस्तान आणि काही रहिवासी ठिकाणी अनेक वर्षांपासून पावसाचे पाणी तुंबण्याची समस्या आहे. त्यामुळे तेथील स्थानिक नागरिकांना दैनंदिन दळणवळण तसेच अंत्ययात्रेच्यावेळी त्रासाला सामोरे जावे लागत होते. हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता.
याठिकाणी रस्त्याचीही दुर्दशा झाली आहे. ही समस्या सुटावी तसेच कब्रस्तानला संरक्षक भिंत व्हावी, काँक्रिट रस्ता आणि गटार व्हावी अशी तेथील रहिवासी तसेच स्थानिक नगरसेवक व आजी-माजी सरपंच यांची मागणी होती. या मागणीच्या अनुषंगाने काही महिन्यांपूर्वी संबंधित नगरसेवक, सरपंच व नागरिकांनी आपल्याकडे तक्रार केली होती, मागणीचे निवेदनही दिले होते. त्या अनुषंगाने समस्या सोडविण्याबाबत नागरिकांना आश्वासन दिले होते असे आमदार श्री. शाह यांनी म्हटले आहे.
या कामांसाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले होते. त्यानुसार ग्राम विकास विभागाने प्रामुख्याने महिंदळे, साक्री रोड येथे काँक्रिट रस्ता, सोनगीर येथील प्रसिद्ध जिंदा मदारशाह दर्गाह येथे रस्ते, पथदिवे व संरक्षक भिंत तसेच न्याहळोद येथील कब्रस्तान येथील कामांसाठी एकूण एक कोटी रुपये मंजूर केल्याचे आमदार श्री. शाह यांनी म्हटले आहे.
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.