Radhakrishna Vikhe  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe : सुजय विखे विधानसभेला निवडणुकीच्या रिंगणात? मंत्री विखेंचे मोठं विधान

Former MP Sujay Vikhe political future : भाजपचे माजी खासदार सुजय विखे संगमनेर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढणार की, नाही लढणार यावर भाजप मंत्री राधाकृष्ण विखे यांचे मोठे विधान.

Pradeep Pendhare

Ahilyanagar News : संगमनेर विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात शड्डू ठोकून उभे असलेल्या भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांच्या भूमिकेला त्यांचे वडील मंत्री राधाकृष्ण विखे यांनी पाठिंबा दिला.

सुजय विखेंची भूमिका चुकीची नसून, तिला माझा पाठिंबा आहे. सुजय विखेंना उमेदवारी नाकारली या बातम्या चुकीच्या असून, ते पेरल्या जात आहेत, असा दावा देखील मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केला.

संगमनेर विधानसभा मतदार संघात भाजपचे माजी खासदार सुजय विखे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. हा मतदार संघ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा आहे. या मतदार संघ काँग्रेसचा (Congress) बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदार संघातून सुजय विखे यांनी आता आमदारकीसाठी नशीब आजमावयाचे म्हणतात. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासह सर्वच विखे कुटुंबिय मत पेरणीसाठी संगमनेरमध्ये मैदानात उतरले आहे.

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात 'मविआ'च्या जागा वाटपाच व्यस्त असल्याने त्यांची कन्या जयश्री थोरात त्यांचा बालेकिल्ला संभाळत आहे. तर सुजय विखे (Sujay Vikhe) देखील मंत्री विखे यांच्या व्यग्र कार्यक्रमांमुळे राहाता आणि संगमनेर विधानसभा मतदार संघात तळ ठोकून आहे. यातून विखे-थोरात यांच्या घरण्यातील राजकीय संघर्ष पुढच्या पिढीपर्यंत आला आहे.

यातच सुजय विखे संगमनेरमधून निवडून लढणार नसल्याच्या बातम्या समोर आल्या. यावर मंत्री राधाकृष्ण विखे यांनी भूमिका मांडली. मंत्री विखे म्हणाले, "सुजय विखे यांना उमेदवारी नाकारल्याची माहिती आणि बातमी चुकीची आहे. भाजपच्या पार्लमेंट बोर्डात याची चर्चा देखील झालेली नाही. पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. या लढतीचा निर्णय त्याचा आहे. त्याच्या या निर्णयाला माझा पाठिंबा आहे".

पिचडांची प्रकृती स्थिर

ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड ब्रेन स्ट्रोकमुळे नाशिकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. मंत्री विखे यांनी त्यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली. प्रकृती स्थिर असून, रिकव्हरी चांगली असल्याचे माहिती राधाकृष्ण विखे यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT