Thorat Vs Vikhe : पारंपारिक राजकीय हाडवैर कायम, उमेदवारीच्या घोषणेआधीच थोरात-विखेंच्या मुलांमध्ये जुंपली

Political struggle between Jayashree Thorat and Sujay Vikhe in Sangamner Assembly Constituency : संगमनेर विधानसभा मतदारसंघात थोरात कुटुंबीयांचा झंझावत सुरू असून यावरून माजी खासदार सुजय विखेंनी डिवचताच जयश्री थोरातांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
Jayashri Thorat Vs Sujay Vikhe .jpg
Jayashri Thorat Vs Sujay Vikhe .jpgSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News : विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होताच, राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. राज्यातील प्रत्येक मतदार संघात राजकीय वाद उफाळला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघातून राजकीय वाद उफळाला आहे. बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे यांच्या पुढच्या पिढीत आता राजकीय संघर्ष उफाळून आला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात आणि भाजप (BJP) नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव माजी खासदार सुजय विखे यांच्या राजकीय संघर्ष पेटला आहे. या राजकीय संघर्ष विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जशी जवळ येईल, तसा तो अधिक होईल, असे दिसते.

संगमनेर विधानसभा मतदारसंघात भाजपचे माजी खासदार सुजय विखे चाचपणी करत आहेत. विखे पिता-पुत्रांनी गेल्या काही दिवसांपासून तसे संगमनेर मतदार संघात दौरे देखील वाढवले आहेत. यातून थोरात देखील अलर्ट झाले आहे. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांची कन्या जयश्री थोरात यांनी स्वतः कडे मतदार संघाची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे प्रत्येक राजकीय निर्णय जयश्री थोरात घेताना दिसत आहेत.

Jayashri Thorat Vs Sujay Vikhe .jpg
Assembly Elections : काँग्रेसची पहिली यादी 'या' तारखेला येणार, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचही ठरलं

माजी खासदार सुजय विखे यांची संगमनेरमधून चाललेल्या चाचपणीला जयश्री थोरात यांनी शेलक्या शब्दात सुनावलं आहे. "मोठं आव्हान काही नाही. लोकशाहीची प्रक्रिया आहे. त्यांनी संगमनेरमधून खुशाल लढावं. त्यांचे स्वागत करू. पण ही थोरातसाहेबांची माणसं आहेत. थोरातसाहेबांचा परिवार आहे. खूप कष्टानं संगमनेर परिवार मोठा झालेला आहे. परंतु विखेंना येथून नाराजच होऊन जावे लागेल, अशी खात्री आहे", असा टोला जयश्री थोरात यांनी लगावला आहे.

जयश्री थोरात यांच्या या विधानावर माजी खासदार सुजय विखे यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "मंत्री राधाकृष्ण विखेसाहेबांवर महाराष्ट्राची जबाबदारी आहे. मंत्रालय किंवा कॅबिनेट बैठकांना जावे लागते. साहेब जेव्हा परत येतील, तेव्हा मी इतर भागात फिरायला सुरवात करेल. पण तिथं एवढी चांगली परिस्थिती असेल, मी तुल्यबळ उमेदवार नसेल, खरचं जर मला पाडण्यात संगमनेर विधानसभा मतदार संघात सोपं असेल, तर मग थोरातांचा सर्व परिवार फिल्डवर का आहे? एवढी चांगली परिस्थिती असेल तर एवढ्या लोकांनी फिल्डवर फिरण्याची आवश्यकता नाही", असा टोला सुजय विखेंनी लगावला आहे.

Jayashri Thorat Vs Sujay Vikhe .jpg
Security of Leaders : अडवाणी, योगींसह देशातील 9 VIP नेत्यांच्या सुरक्षेत मोठा बदल; कोण आहेत हे नेते?  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com