Shirdi Breaking News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shirdi Breaking News : राधाकृष्ण विखे पाटलांच्या शिष्टाईला मोठं यश; शिर्डीतील बेमुदत बंद मागे

Radhakrishna Vikhe Patil : शिर्डी ग्रामस्थांनी बेमुदत बंदची हाक दिल्यानंतर सरकारी पातळीवर वेगवान हालचाली घडल्या..

सरकारनामा ब्यूरो

Shirdi News : शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. त्यात सुट्ट्यांमध्ये या गर्दीत विलक्षण वाढ होते. पण शिर्डीच्या साई मंदिरात आता सीआयएसएफची सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. या सुरक्षेला तीव्र विरोध करत सर्वपक्षीयांसह ग्रामस्थांनी येत्या १ मेपासून एल्गार पुकारत बेमुदच बंदची हाक दिली होती. यामुळे साईभक्तांची चिंता वाढली होती. मात्र, अखेर साईभक्तांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

शिर्डी(Shirdi) ग्रामस्थांनी बेमुदत बंदची हाक दिल्यानंतर सरकारी पातळीवर वेगवान हालचाली घडल्या. यात राज्याचे महसूलमंत्री व अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrishna Vikhe Patil) यांची शिष्टाई यशस्वी ठरली आहे. विखे पाटलांसोबत प्रशासन, ग्रामस्थांच्या झालेल्या बैठकीनंतर हा बेमुदत बंदचा निर्णय मागे घेण्यात आल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली होती.

शिर्डीच्या साई मंदिरात आता सुरक्षेसाठी सीआयएसएफची सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. या सुरक्षेविरोधात सर्वपक्षीयांसह ग्रामस्थांनी एल्गार पुकारला आहे. ही सुरक्षा आल्यास ग्रामस्थांना त्रास होऊ शकतो, याकरता सीआयएसएफ(CISF) सुरक्षेविरोधात ग्रामस्थांनी बेमुदत बंदची हाक दिली आहे.

सध्या शिर्डीच्या साई मंदिरा(Sai Temple) त संस्थानचे स्वतःचे सुरक्षा रक्षक आणि महाराष्ट्र पोलिसांचे सुरक्षारक्षक तैनात आहेत. त्यातच, आता सीआयएसएफची सुरक्षा येणार आहे. या सुरक्षेमुळे ग्रामस्थांना त्रास होऊ शकतो असं म्हटलं जात आहे. त्यामुळे बुधवारी ग्रामस्थांनी सर्व पक्षीयांसह बैठक घेतली.

या बैठकीत बेमुदत बंदची हाक देण्यात आली होती. बंद दरम्यान साई मंदिर, दर्शन व्यवस्था, साई संस्थानची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था सुरू राहणार आहे. परंतु, शिर्डी बंद असल्याने वाहतुकीसह अन्य सुविधांपासून भक्तांना वंचित राहावं लागू शकते. यामुळे भाविकांची गैरसोय होण्याची शक्यता होती.

राज्य सरकार न्यायालयात बाजू मांडणार

साई मंदिरातील प्रस्तावित सीआयएसएफ सुरक्षेला ग्रामस्थांनी विरोध केला होता. याच धर्तीवर शुक्रवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची भेट घेतली. त्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. आता ग्रामस्थांच्या वतीने उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात येणार आहे. ग्रामसभेत ठराव घेऊन ग्रामस्थांच्या मागण्या उच्च न्यायालयापर्यंत पोहचवणार आहे. राज्य सरकार न्यायालयात बाजू मांडणार असल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली आहे.

काय आहे मागण्या?

साईबाबा संस्थानला सीआयएसएफ अर्थात केंद्रीय सुरक्षा बल यंत्रणा नको. संस्थानचा कारभार पाहण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आयएएस ऐवजी प्रांताधिकारी दर्जाचा अधिकारी असावा , साई संस्थान विश्वस्त मंडळात स्थानिकांना ५० टक्के आरक्षण असावं ,साईबाबा संस्थानचे सध्या पाहत असलेले तदर्थ समितीमुळे सर्व कारभार मंदावलेला असून सर्व निर्णय प्रलंबित आहे. तर यावर राज्य शासनाने नियुक्त समिती नेमावी या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र दिनापासून बेमुदत शिर्डी बंदची हाक देण्यात आली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT