SatyaPal Malik Allegations: पुलवामा हल्ल्यावरून मोदींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणाऱ्या मलिकांच्या घरी CBI चे पथक दाखल !

Satyapal Malik Allegations on Narendra Modi : "मोदी सरकारच्या चुकांमुळेच पुलवामासारखा हल्ला झाला.."
Satyapal Malik Allegations on Narendra Modi
Satyapal Malik Allegations on Narendra Modi Sarkarnama
Published on
Updated on

SatyaPal Malik News: पुलवामा हल्ल्याप्रकरणी खळबळजनक आरोप करून माध्यमांच्या प्रकाशझोतात आलेले जम्मू-काश्मीरचे माजी नायब राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरी सीबीआय दाखल झाली आहे. 60 कोटी रुपयांच्या कथित लाचखोरीप्रकरणी त्यांच्या घरी आता सीबीआयचे पथक पोहचले आहेत. या संदर्भात त्यांनी स्वत:च ट्विट करत माहिती दिली आहे. (CBI team lands up at Satya Pal Malik home to quiz him on insurance scam )

जम्मू-कश्मीर राज्यातील जलविद्युत प्रकल्पामध्ये आणि विमा योजनेतही आर्थिक गैरव्यवहार झाला, मोठ्या प्रमाणात भ्रष्टातार झाला, असा खळबळजनक आरोप मलिक यांनी नुकताच केला होता. यानंतर सीबीआयने दोन दिवसांपूर्वीच नोटील बजावली असल्याची माहिती मलिक यांनी दिली होती. आज त्यांच्या घरी सीबीआयचे पथक दाखल झाले आहे.

Satyapal Malik Allegations on Narendra Modi
Mahavikas Aaghadi Rally : ''१ मे रोजी मुंबईतली 'वज्रमूठ' सभा शेवटची असेल..''; भाजपच्या 'या' नेत्याचं मोठं विधान

23 ऑगस्ट 2018 ते 30 ऑक्टोबर 2019 या कालावधीत सत्यपाल मलिक जम्मू-कश्मीरचे नायाब राज्यपाल होते. यानंतर त्यांनी गोवा राज्यात एक वर्ष आणि मेघालय राज्यात दोन वर्षे राज्यपाल म्हणून काम पाहिले. मागील आठवड्यात 15 एप्रिल रोजी सत्यपाल मलिक यांनी ‘द वायर’ ला दिलेल्या मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी अनेक खळबळजनक आरोप केले होते.

यानंतर त्यांना एका आठवड्यातच त्यांना सीबीआयने त्यांना नोटीस पाठवली आहे. भ्रष्टाचारसंबंधी त्यांनी खळबळ उडवून देणाऱ्या आरोपांमुळे त्यांनी नोटीस सीबीआयने नोटीस बजावली आहे, याबाबत त्यांनी सीबीआयने खुलासा मागविला आहे.

Satyapal Malik Allegations on Narendra Modi
BJP's Reply To Congress Criticism: काँग्रेसच्या टीकेला भाजपचे 'जहरी' उत्तर; पंतप्रधान मोदी विषारी साप तर सोनिया गांधी...
SatyaPal Malik Tweet
SatyaPal Malik TweetSarkarnama

मलिकांनी काय केला होता गौप्यस्फोट ?

14 फेब्रुवारी 2019 या दिवशी जम्मूतून श्रीनगरच्या दिशेने जाणाऱ्या सीआरपीएफ ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला घडवून आणला. या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. मात्र या जवानांना जर एअपलिफ्ट केले असते, तर कदाचित हा हल्ला झालाच नसता. यासाठी विमाने उपलब्ध करून द्या, अशी मागणी मी केंद्राच्या गृहमंत्रालयाला केली होती. मात्र माझी ही मागणी फेटाळून लावण्यात आली, यावर बोलू नका. तुम्ही गप्प बसा, याबाबत कुणाकडेही वाच्यता करू नका, असे मला सांगण्यात आले. मोदी सरकारच्या चुकांमुळेच पुलवामासारखा हल्ला झाला, असा थेट आरोप मलिकांनी केला होता.

(By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com