Radhakrishna Vikhe sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Minister Radhakrishna Vikhe News : चारा छावण्या सुरू करण्याची गरज नाही, मंत्री विखेंनी सांगितले मोठे कारण...

Pradeep Pendhare

Ahmednagar News : राज्यात दुष्काळाचे संकट गडद होत चालले असून, पाण्याबरोबरच चाराटंचाईमुळे पशुधन संकटात आहे. यातच महसूल तथा पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांनी चारा छावण्या सुरू करण्याची गरज नसल्याचा निर्णय सांगितला. चारा छावण्यांमध्ये पूर्वी भ्रष्टाचार (Corruption) झाल्याच्या मोठ्याप्रमाणात तक्रारी झाल्या होत्या. त्यामुळे आज चारा छावण्या सुरू करण्याची आवश्यकता वाटत नाही, असे मंत्री विखे यांनी म्हटले आहे.

महसूल तथा पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांनी पुढचे अडीच महिने चारा पुरेल, अशी कार्यवाही केल्याचे सांगितले. त्यामुळे चाराटंचाई भासणार नाही. चारा टंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन विभागातील अधिकाऱ्यांना चारा नियोजनाच्या सूचना केल्या आहेत. यावेळी चारा उत्पादनासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना बियाणांची उपलब्धता करून देण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून निधीची तरतूद केली आहे. तसेच शेतकरी (Farmer) उत्पादीत करत असलेल्या चाऱ्याचा दर देखील सरकारने निश्चित केला आहे. त्यामुळे संपूर्ण उत्पादीत झालेला चारा खरेदी करण्याची हमी सरकारने घेतल्याचे मंत्री विखे यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चारा छावण्या सुरू करण्यासंदर्भात मंत्री विखे यांनी मोठा निर्णय सांगितला. ते म्हणाले, "चारा छावण्या सुरू करण्याबाबत मतमतांतरे आहेत. पूर्वी यामध्ये भ्रष्टाचार (Corruption) झाल्याचा तक्रारी झाल्या होत्या. यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे". पुढचे दोन ते अडीच महिने चारा पुरेल, असे नियोजन असल्याने चारा छावण्या सुरू करण्याची आवश्यकता वाटत नाही, असे मंत्री विखे यांनी सांगितले. Minister Radhakrishna Vikhe said that he will not start fodder camps because

पश्चिम नद्यांचे पाणी वळवणार...

नगर जिल्ह्यातील पाणी प्रश्नावर भाष्य करताना मंत्री विखे म्हणाले, "जिल्ह्यात पावसाचे प्रमाण खूप कमी झाले आहे. त्यामुळे सिंचनाचे प्रश्न निर्माण होतात. गोदावरी, प्रवरा, कुकडी धरण समूहात पाण्याचे प्रश्न नेहमीच निर्माण होतात. त्यातच समन्यायी पाणी वाटप कायद्याने जायकवाडीला पाणी द्यावे लागते. यातून मार्ग काढण्यासाठीच आता पश्चिम वाहिनी नद्याचे पाणी तुटीच्या खोऱ्यात वळविण्याच्या धोरणाला गती द्यावी लागेल".

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सुध्दा आश्वासित केले असल्याने सरकारी पातळीवर याची कार्यवाही सुरू झाली आहे. कुकडीच्या पाण्याबाबतही आता पुणे (Pune) जिल्ह्यातील नेत्यांशी चर्चा करून कायमस्वरुपी मार्ग काढावाच लागेल. कुकडीच्या आवर्तनाबाबत लवकरच अधिकाऱ्यांची बैठक घेवून निर्णय करण्यात येईल, असे मंत्री विखे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT