Hatkanangale Lok Sabha Election 2024 News: महाराष्ट्रातील अनेक लक्षवेधी लोकसभा मतदारसंघातील लढतीमध्ये कोल्हापूर आणि हातकणंगले (Kolhapur and Hatkanangle) मतदारसंघाचा समावेश होता. महाविकास आघाडी आणि महायुतीतील अनेक विरोधक एकमेकांच्या मांडीला मांडी लावून युती आणि आघाडीधर्मासाठी प्रचार करताना दिसले. मात्र आता निवडणूक पार पडल्यानंतर युतीतील काही नेत्यांनी युती धर्म पाळला नसल्याची ओरड सुरु झाली आहे.
अशातच आता भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी हातकणंगले मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांचा प्रचार न करता त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांचा प्रचार केल्याचा आरोप भाजप नेत्यांनीच केला आहे. त्यामुळे आता त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी भाजप आणि महायुतीच्या नेत्यांकडून केली जात आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भाजपचे (BJP) जिल्हाप्रमुख आणि पदाधिकारी असूनही हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या विरोधात प्रचार करणाऱ्या जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील (Nishikant Bhosle Patil) यांची पदावरून हाकालपट्टी करावी, अशी मागणी इस्लामपूरचे भाजप नेते विक्रम पाटील आणि राहुल महाडिक यांच्यासह महायुतीच्या अनेक नेत्यांनी केली आहे. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार, राष्ट्रवादीचे चंद्रशेखर तांदळे, मनसेचे सनी खराडे यांनी संयुक्त पत्रकार बैठकीत घेत ही मागणी केली आहे. तसेच याबाबतची मागणी प्रदेश पातळीवर निवेदनाद्वारे करणार असल्याची माहितीही विक्रम पाटील आणि राहुल महाडिक यांनी दिली.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी भाजपसह शिवसेना (शिंदे गट) राष्ट्रवादी (अजित पवार) मनसे आणि अन्य घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी जीवाचे रान करून काम केले. मात्र, भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार न करता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा प्रचार केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे आता भाजपकडून भोसले यांच्यावर नेमकी काय कारवाई केली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.