Raksha Khadase Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Raksha Khadase : राज्यमंत्री रक्षा खडसेंना वाटत होती धाकधूक, 'हे'आहे कारण

Minister Raksha Khadse was worried : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी पक्षाविषयी व्यक्त केली कृतज्ञता, यंदाच्या निवडणुकीत अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.

Sampat Devgire

Raksha Khadse News : रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विशेष उल्लेख करीत कृतज्ञता व्यक्त केली.

युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री खडसे यांनी आपला पदभार स्वीकारला. त्यानंतर त्या मतदारसंघात आल्या होत्या. एका स्थानिक वाहिनीच्या प्रतिनिधींशी त्यांनी चर्चा केली. यावेळी त्या म्हणाल्या यंदाच्या निवडणुकीत अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.

रावेर मतदारसंघात यंदा जातीय समीकरणे प्रभावीपणे काम करीत होती. त्यामुळे निवडणूक निकाला विषयी मला धाकधूक होती. या शब्दात त्यांनी निवडणुकीच्या निकालाविषयी आपली चिंता व्यक्त केली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बजरंग दलाने रावेर मतदारसंघात (Raver Constituency) घरोघर जाऊन प्रचार केला. मतदारांशी व्यक्तिगत संपर्क निर्माण केला होता. त्यामुळे आपला विजय सुकर झाला. त्यांच्या प्रयत्नांमुळेच मी विजयी झाले अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.

कुटुंबाचा विशेष पाठिंबा मला राहिला आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मला मुलगी प्रमाणे प्रेम आणि वागणूक दिली. त्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळेच राजकीय यश मिळाले. यापुढे खडसे कुटुंबीयांचा हा राजकीय वारसा मी चालवेन असे त्या म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT