Raksha Khadse: 'मी रक्षा निखिल खडसे...'; पहिल्यांदाच घेतली केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ

Raksha Khadse took oath as Union Minister : नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. त्यांच्यासह यावेळी देशभरातील अनेक नेत्यांनी शपथ घेतली. यामध्ये महाराष्ट्रातील 6 खासदारांचा समावेश आहे.
Union Minister Raksha Khadse
Union Minister Raksha KhadseSarkarnama

Raksha Khadse took oath as Union Minister : घरात राजकीय मतभेद असतानाही पक्षाशी एकनिष्ठ आणि सलग तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत विजयश्री मिळवल्यामुळे, एनडीएप्रणीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये रावेर लोकसभा मतदारसंघाच्या रक्षा खडसे यांची केंद्रीय मंत्रि‍पदी वर्णी लागली आहे. त्यांनी आज (रविवारी) केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

रविवारी सायंकाळी (ता. 9 जून) रोजी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. त्यांच्यासह यावेळी देशभरातील अनेक नेत्यांनी शपथ घेतली, यामध्ये राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी अशा दिग्गजांचा समावेश होता. शपथ घेतलेल्या मंत्र्यांमध्ये महाराष्ट्रातील 6 खासदारांचा समावेश होता. (Narendra Modi took oath as Prime Minister for the third time)

मोदी सरकार 3.0 मध्ये महाराष्ट्रातील पहिल्या केंद्रीय मंत्री म्हणून रक्षा खडसे (Raksha Khadse) यांची वर्णी लागली. कोथळी गावच्या सरपंच ते मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री अशी त्यांची राजकीय वाटचाल राहिली आहे. रक्षा खडसे यांचे सासरे एकनाथ खडसे यांनी भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतरही रक्षा खडसे भाजपमध्येच राहिल्या. त्यांच्या याच निष्ठेचं फळ आता त्यांना मिळाल्याचं बोललं जात आहे.

Union Minister Raksha Khadse
Nitin Gadkari : 'मै नितीन जयराम गडकरी...', सलग तिसऱ्यांदा घेतली मंत्रिपदाची शपथ

रक्षा खडसे यांना केंद्रीय मंत्रीपदाची संधी मिळणार असल्याचं जाहीर होताच सासरे एकनाथ खडसे यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी त्यांचे डोळे पाणावल्याचंही दिसलं. शिवाय रक्षाताईंना मंत्रीपद मिळत आहे, याचा आमच्या कुटुंबाला आनंद आहे. सलग 3 वेळा त्या रावेर मतदारसंघातून निवडून आल्या. त्यांनी आपल्या कार्यकाळात चांगलं काम केलं आहे. शिवाय आता त्यांची केंद्रीय मंत्री म्हणून तिसरी टर्मही चांगली राहील, असा विश्वास एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com