FDA Commissioner Tukaram Mundhe intensifies action against food adulteration in Maharashtra as legislators question delays in laboratory reports and enforcement measures. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Food Adulteration Scam : 20 लाखांचे भेसळयुक्त तेल; भेसळीच्या रॅकेटला सरकारचाच आशीर्वाद; सत्ताधारी आमदाराचाच गंभीर आरोप

FDA Maharashtra : अन्न आणि औषध प्रशासन विभाग सध्या भेसळी विरुद्ध धडाकेबाज कारवाईने चर्चेत आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबत थेट कारवाई केली आहे. त्यामुळे हा विभाग चर्चेत आला आहे. दुसरीकडे मात्र पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्याच दिवशी सत्ताधारी आमदाराने या विभागाचे वाभाडे काढले.

Sampat Devgire

Nandurbar News, 25 Jun : एकीकडे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या धडाकेबाज कारवाईची चर्चा आहे. दुसरीकडे मात्र अन्न व औषध प्रशासनात त्याआधीच्या सावळ्या गोंधळाची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. सत्ताधारी आमदारानेच या प्रश्नावर सरकारचे वस्त्रहरण केले.

अन्न आणि औषध प्रशासन विभाग सध्या भेसळी विरुद्ध धडाकेबाज कारवाईने चर्चेत आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबत थेट कारवाई केली आहे. त्यामुळे हा विभाग चर्चेत आला आहे. दुसरीकडे मात्र पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्याच दिवशी सत्ताधारी आमदाराने या विभागाचे वाभाडे काढले.

आयुक्त मुंडे येण्याआधी या विभागात किती सावळा गोंधळ होता तो मांडला. त्यातून गुन्हेगारांना कसे संरक्षण मिळते? त्यावर सरकार गप्प कसे? असा गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नंदुरबार येथे दोन वर्षांपूर्वी वीस लाख रुपयांचे भेसळयुक्त तेल जप्त करण्यात आले. भेसळ करणाऱ्या व्यापारी गुटख्यापासून तर अनेक वस्तूंची भेसळ करतो. याचा व्यापार आदिवासी भागात जोरात आहे.

दोन वर्षांपूर्वी वीस लाख रुपयांचे भेसळयुक्त तेल जप्त करण्यात आले. त्याबाबत भेसळीचा नमुना बेंगलोर येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आला. मात्र गेल्या दोन वर्षात त्याचा अहवाल आला नाही. त्यामुळे हे भेसळयुक्त तेल व्यापाऱ्याला परत करण्यात आल्याचा धक्कादायक आरोप आमदार पाडवी यांनी केला.

आमदार आमशा पाडवी या विषयावर चांगलेच आक्रमक होते. राज्यातील सरकार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विविध मंत्री सत्तेत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे अपेक्षैने पाहतो. मात्र प्रशासन निष्क्रिय असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

या संदर्भात दोन वर्षांपूर्वी लक्षवेधी सूचना मांडण्यात आली. यावर सरकारने कारवाईच्या आश्वासन दिले. त्याचा पाठपुरावा देखील झाला. मात्र प्रशासनाने काहीच कारवाई केली नाही. बंगरूळू येथील प्रयोग शाळेतून अहवाल येण्यास किती दिवस लागतात? दोन वर्षात देखील अहवाल येत नसेल तर सरकार काय करीत आहे?

या विभागाचे मंत्री काय कारवाई करणार? अशा प्रश्नांची सरबत्ती आमदार पाडवी यांनी केली. सत्ताधारी आमदारानेच सरकारला भेसळीच्या प्रश्नावर धारेवर धरल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे. या संदर्भात मंत्री नरहरी झिरवाळ यांनी प्रशासनाला यावर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जातील असे आश्वासन दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT