MNS Setback : राज ठाकरेंना धक्का! उपजिल्हाध्यक्षांसह पदाधिकारी अन् शेकडो कार्यकर्त्यांचे सामूहिक राजीनामे; शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार?

Raigad MNS Leader Sandeep Thakur Resigns : रायगड जिल्ह्यात नुकताच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला असून एकमेक असणारा नेत्यानेही साथ सोडली.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Raigad Political News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरने ठाकरेंचे सहा खासदार फोडत राजकीय भूकंप केला. यामुळे ठाकरेंना मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू आहे. तर असे धक्के अद्याप बसणे बाकी असून आमदार आणि मुंबई महपालिकेतील नगरसेवक देखील फुटतील अशी शक्यता व्यक्त केली जातेय. या सर्व चर्चेदरम्यान कोकणात उद्धव ठाकरेंपाठोपाठ राज ठाकरेंना देखील जोरदार धक्का बसला आहे. येथे उपजिल्हाध्यक्षांसह पदाधिकारी अन् शेकडो कार्यकर्त्यांचे सामूहिक राजीनामे दिले असून आता मनसेला भली मोठी गळती लागली आहे. तर या गळतीमुळे शिंदेंच्या शिवसेनेचे ऑपरेशन टायगरच्या पार्ट टू ची आता कोकणात जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

एकीकडे राज्यात उद्धव ठाकरेंच्या उबाठा पक्षात पुन्हा एकदा उभी फूट पडली असतानाच खासदारांपाठोपाठ त्याचे आमदार आणि मुंबई महपालिकेतील नगरसेवकही शिंदेंच्या शिवसेनेत जातील अशी चर्चा आहे. या चर्चेमुळे डॅमेज कंन्ट्रोलसाठी मैदानात उतरलेल्या ठाकरेंना कोकणात मात्र मोठा धक्का बसला आहे. येथे शिवसेनेचे श्रीवर्धन नगरपालिकेचे नगराध्यक्ष अतुल चोगले यांच्यासह त्यांच्या गटाने ठाकरेंची साथ सोडली. यामुळे रायगड जिल्ह्यात शिवसेनेची उरली सुरली ताकदही कमी झाली असून ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

ठाकरेंच्या फुटलेल्या या खासदारांवरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जोरदार निशाना साधला होता. तसेच यावरून टीका देखील केली होती. आता या गोष्टीला अद्याप दोन-चार दिवसही होत नाही तोच कोकणात मनसेला मोठे खिंडार पडले आहे. रायगडमध्ये मनसेला धक्का बसला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्यासह पेण तालुक्यातील अनेक पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आपल्या पदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचे सामूहिक राजीनामे दिले आहेत.

Raj Thackeray
Shivsena Setback : शिंदेंच्या शिवसेनेला खिंडार! खोपोलीत अंतर्गत धुसफूसीचा स्फोट, शिवसैनिकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

हे सर्व राजीनामे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात आले असून उपजिल्हाध्यक्ष ठाकूर यांच्यासह पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. हा प्रवेश झाल्यास एकाच वेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह राज ठाकरेंच्या मनसेला रायगडमध्ये शिंदेंकडून जोरदार धक्का असेल.

याबाबत साम टीव्हीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपजिल्हाध्यक्ष ठाकूर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे अलीकडेच रायगड जिल्ह्यात जाहीर करण्यात आलेल्या नव्या कार्यकारिणीवरून नाराज होते. या निवडीवरून त्यांच्यात तीव्र नाराजी होती. तशी व्यक्त देखील करण्यात आली होती.

पक्षासाठी अनेक वर्षे काम करणाऱ्या जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याचा आरोप करत मनसेचे संपर्क अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करण्यात आली होती. याचबरोबर या सर्वांनी पक्ष संघटनेत स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नसल्याची व्यक्त करत एकत्रितपणे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

Raj Thackeray
Raigad Politics : अनिकेत तटकरे-गोगावले भेटीनंतर रायगडचे राजकारण तापले: महेंद्र दळवींचा स्फोटक इशारा; 'तटकरेंवर विश्वास नाही, दगाफटका...'

दरम्यान, राजीनामा दिलेले उपजिल्हाध्यक्ष ठाकूर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते येत्या आठ दिवसांत शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. दरम्यान या सामूहिक राजीनाम्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत होणाऱ्या पक्ष प्रवेशामुळे रायगड जिल्ह्यात मनसेला मोठा फटका बसणार असून राजकीय समीकरणे बदलणार आहेत. अद्याप हा प्रवेश झाला नसून आता मनसे नेतृत्व नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी प्रयत्न करते की नाही याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com