Balasaheb Thorat Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Balasaheb Thorat: '...तेव्हा बबनराव ढाकणेंनी दिलेली कौतुकाची थाप आजही प्रेरणादायी'; थोरातांनी दिला आठवणींना उजाळा

Pradeep Pendhare

Ahmednagar News: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी (कै.) बबनराव ढाकणे यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. "पहिल्यांदा आमदार झालो, तेव्हा बबनराव ढाकणे यांनी बोलावून घेत पाठीवर जी कौतुकाची थाप दिली होती, ती आजही प्रेरणादायी आहे", असे सांगून आमदार थोरात यांनी बबनराव ढाकणे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या निधनानंतर आमदार थोरात यांनी मंगळवारी पाथर्डीत येऊन त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. बबनराव ढाकणे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत श्रद्धांजली वाहिली. राष्ट्रवादीचे अँड.प्रताप ढाकणे, सुशिला मोराळे, प्रभावती ढाकणे, ऋषिकेश ढाकणे, राहुल राजळे, कृष्णा राजळे, शिवशंकर राजळे, सिद्धेश ढाकणे यावेळी उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार थोरात यांनी बबनराव ढाकणे यांच्या आठवणींना उजाळा दिला. जुने आणि आताचे राजकीय वातावरण कसे झाले आहे, यावर थोरात यांनी भाष्य केले. 'आजच्या राजकारणाची पातळी वेगळ्या दिशेने चालली आहे.

पक्षीय बंधनांमुळे राजकारणात वैयक्तिक संबंधांना कुठेतरी मर्यादा पडत आहेत. मी 1985 मध्ये पहिल्यांदा आमदार झालो. एक तरुण विधिमंडळात पोहोचला म्हणून बबनराव ढाकणे यांनी बोलावून घेतले. प्रचंड कौतुक केले. पाठीवर यावेळी मारलेली थाप प्रेरणा आणि ऊर्जा देणारी होती', असे सांगत आमदार थोरात यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

बबनराव ढाकणे हे विधिमंडळात विरोधी पक्षनेते होते. त्यावेळी त्यांची जनसमान्यांसाठी असलेली तळमळ जवळून पाहायला मिळाली. यातून जनसामान्यांच्या कामाची प्रेरणा मिळाल्याचे आमदार थोरात यांनी सांगितले.

नगरचे आमदार पूर्वी विधिमंडळात एकत्र जेवायचे, आता...

आजच्या राजकीय परिस्थितीवर आमदार बाळासाहेब थोरात यांनी यावेळी मार्मिक भाष्य केले. पूर्वी नगर जिल्ह्यातील सगळे आमदार अधिवेशन काळात सोबत जेवण करायचे. आता मात्र, भेट सुद्धा टाळतात. यामुळे आजचे राजकारण किती टोकाचे झाले आहे, हे दिसते.

बबनराव ढाकणे नेहमीच मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहिले आहेत. नेहमीच राजकीय बंधनांच्या पलीकडे जावून त्यांनी संबंध जपले आहेत. विधिमंडळात आजही बबनराव ढाकणे यांचे नाव घेतल्यास जनसामान्यांसाठी आक्रमक पवित्रा घेणारा संघर्षयौद्धा म्हणून नेता अशी आठवण काढली जाते, असे आमदार थोरात यांनी आठवणीत सांगितले.

Edited By - Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT